आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयकर विभागाच्या कारवाईनंतर अभिनेत्री तापसी पन्नू हिने सोशल मीडियावर तीन पोस्ट शेअर करत तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या या पोस्टच्या माध्यमातून तापसीने कंगना रनोट हिच्यावरही निशाणा साधला. आता कंगनाने एक पोस्ट शेअर करत तापसीवर पलटवार केला आहे. सोबतच तापसीवर निशाणा साधत तू नेहमीच स्वस्त राहशील, असेही कंगनाने म्हटले आहे.
तुम्ही बलात्कारी स्त्रीवादी आहात
कंगनाने पोस्ट शेअर करत लिहिले, 'तू नेहमीच स्वस्त राहणार आहेस, कारण तुम्ही सगळे बलात्कारी स्त्रीवादी आहात. तुझा रिंग मास्टर अनुराग कश्यपवर 2013 मध्ये देखील कर चोरी प्रकरणामुळे छापे टाकण्यात आले होते. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेला रिपोर्ट समोर आला आहे. जर तू दोषी नसशील तर कोर्टात जा आणि ते सिद्ध करुन दाखव, कम ऑन सस्ती,' या आशयाची पोस्ट कंगनाने लिहिली आहे.
आता मी स्वस्त राहिले नाहीये
यापूर्वी तापसी पन्नूने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली होती. आपल्या पहिल्या पोस्टमध्ये तापसीने म्हटले होते, - 'तीन दिवसांच्या सखोल चौकशीतून तीन मुख्य गोष्टी समोर आल्या आहेत. एक म्हणजे पॅरीसमधील ज्या कथित बंगल्याची चावी माझ्याजवळ असल्याचा दावा केला जातोय, ज्याची मी मालकीण आहे, असे सांगितले जात आहे, तिथे मी कधीच उन्हाळ्याच्या सुट्टीवर गेलेले नाही,' असे तापसीने म्हटले आहे.
पाच कोटींची पावती मिळाल्याच्या आरोपावर तापसीने आपल्या दुसर्या पोस्टमध्ये म्हटले, “पाच कोटींची कोणतीही पावती तिच्याजवळ नसून तिने कुणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत.” शेवटी तिसर्या पोस्टमध्ये तिने खुलासा केला की, 2013 च्या कोणत्याही छाप्याशी तिचा खुलासा नाही. तिने लिहिले, 'अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 2013 मध्ये माझ्या घरावर छापा पडला होता. आता मी स्वस्त राहिले नाहिये,' असे तापसी म्हणाली आहे. कंगनाने अनेकदा तापसीचा उल्लेख 'स्वस्त कॉपी' म्हणून केला आहे, त्यावर तापसीने उपरोधिक टोला लगावला.
3 मार्च रोजी पडला होता आयकरचा छापा
आयकर विभागाने 3 मार्च रोजी तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या घर आणि कार्यलयावर छापे टाकले होते. विभागाच्या रिपोर्ट्नुसार, तापसी आणि अनुराग यांनी सुमारे 350 कोटींची टॅक्स चोरी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.