आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वहिनीच्या चुलत बहिणीवर जडला होता राजू यांचा जीव:शिखा यांना प्रेमाची कबुली द्यायला लागली 12 वर्षे, मग झाले लग्न

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. प्रोफेशनल लाइफसारखीच त्यांची लव्ह लाइफही रंजक होती. राजू यांनी 1993 मध्ये शिखा यांच्यासोबत लग्न केले होते, मात्र यासाठी त्यांना 12 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. राजू यांनी त्यांच्या भावाच्या लग्नात शिखा यांना पहिल्यांदा पाहिले आणि ते प्रेमात पडले. यानंतर ते अनेकदा निमित्त करून शिखा यांच्या घरी जात असत, त्यामुळे दोघांमध्ये जवळीक वाढली. राजू मुंबईत आल्यानंतरही दोघे एकमेकांना पत्रे पाठवत असत.

पहिल्या नजरेचे प्रेम

राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीचे नाव शिखा श्रीवास्तव आहे. राजू यांनी त्यांच्या भावाच्या लग्नात शिखा यांना पहिल्यांदा पाहिले आणि त्यांना पाहताच त्यांचा जीव जडला. ते शिखा यांच्या प्रेमात पडला. वास्तविक, राजू वऱ्हाडासह फतेहपूरला गेले होते. तिथे त्यांनी शिखा यांना पहिल्यांदा पाहिले आणि पाहताच ते प्रेमात पडले. बरीच चौकशी केल्यानंतर त्यांना कळले की शिखा ही त्यांच्या वहिनीची चुलत बहीणच आहे. शिखा त्यांच्या कुटुंबासोबत इटावा येथे राहत होत्या. यानंतर राजू कोणत्या ना कोणत्या कारणाने वारंवार इटावाला जात असत. त्यामुळे शिखा आणि राजू यांच्या भेटीगाठीही वाढल्या. पण हिंमत करूनही राजू यांना शिखासमोर कधीच मन मोकळे करता आले नाही.

दूर राहूनही कमी झाले नाही प्रेम

1982 मध्ये नशीब आजमावण्यासाठी राजू मुंबईत आले, पण तरीही ते शिखाला विसरले नाहीत. यादरम्यान राजू आणि शिखा एकमेकांना पत्र लिहायचे. एका मुलाखतीत राजू यांनी खुलासा केला होता, शिखाही त्याला पसंत करायची, कारण राजू यांच्यासाठी जे काही लग्नाचे प्रस्ताव यायचे, त्यांना त्या नाकारायच्या.

12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बांधली लग्नगाठ

जेव्हा राजू पूर्णपणे मुंबईत स्थायिक झाले, तेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना शिखाच्या कुटुंबातील सदस्यांशी त्यांच्या आणि शिखाच्या नात्याबद्दल बोलण्यास सांगितले. त्यांच्या घरच्यांनीही सहमती दर्शवली, त्यानंतर त्यांनी शिखाच्या कुटुंबीयांशी बोलणी केली. यानंतर एके दिवशी शिखा यांचे भाऊ राजू यांच्या घरी आले आणि त्यांच्या घराची भव्यता पाहून त्यांनी या स्थळाला होकार दिला. त्यानंतर 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 1993 मध्ये राजू आणि शिखा लग्नाच्या बेडीत अडकले.

नच बलिएमध्ये पत्नी शिखासोबत झळकले राजू

राजू श्रीवास्तव आपल्या कॉमेडी आणि वक्तव्यांनी सतत चर्चेत असायचे, तर त्यांचे कुटुंब त्यापासून दूर राहिले. राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी नच बलिये या रिअॅलिटी शोमध्ये त्यांच्यासोबत दिसल्या होत्या, पण त्यांनी स्वत:ला इंडस्ट्रीपासून दूर ठेवले होते. शोमध्ये दोघांची जोडी लोकांना खूप आवडली, पण काही काळानंतर दोघेही बाहेर पडले.

मुलगी सहायक दिग्दर्शक, तर मुलगा सितार वादक

राजू यांचे लखनऊमध्ये शिखा यांच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना मुलगी अंतरा आणि मुलगा आयुष्मान ही दोन मुले आहेत. राजू यांची कन्या अंतरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती असिस्टंट डायरेक्टरही आहे. अंतराने लहानपणी असे धाडस दाखवले होते की त्यामुळे तिला शौर्य पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते. याबाबत राजू यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, एकदा ते शोसाठी परदेशात गेले असताना एका रात्री काही चोर घरात घुसले. त्यावेळी त्यांच्या लहान मुलीने साहस दाखवत त्यांचा मुकाबला केला. अंतराने दोन चोरांना पकडण्यात मदत केली होती. या शौर्यासाठी राजू श्रीवास्तव यांच्या मुलीची 2006 मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली होती. राजू यांचा मुलगा आयुष्मान अजूनही शिकत असून तो एक सितारवादकही आहे.

राजू यांच्या निधनाने कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

राजू यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी शिखा यांची एक प्रतिक्रिया समोर आली आहे. हे युद्ध जिंकून राजूने परत यावे, अशी त्यांची इच्छा होती, पण तसे झाले नाही, असे शिखा यांनी म्हटले आहे. ते एक महान योद्धा होते आणि आता माझ्याकडे काहीच उरले नाही. त्याचबरोबर वडिलांच्या जाण्याने त्यांच्या मुलांनाही मोठा धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...