आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्याच्या कचाट्यात अडकला शाहरुखचा मुलगा:वरिष्ठ वकील म्हणाले - आर्यनने ड्रग्जचे सेवन केले की नाही याने फरक पडत नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल होणार

मनीषा भल्ला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्यनने ड्रग्ज घेतले नसले तरी त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अनेक चित्रपट कलाकारांवर कारवाई केली होती. मात्र, शनिवारी रात्री मुंबईतील एका क्रूझवर झालेल्या एनसीबीच्या छाप्यानंतर बॉलिवूड कलाकारांना कायद्याची भीती वाटत नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शनिवारी एनसीबीच्या छाप्यानंतर ज्यांच्यावर कारवाई केली जात आहे त्यांच्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा देखील समावेश आहे.

छापा आणि त्यानंतर केलेल्या कारवाईवर NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी दैनिक भास्करला सांगितले - सध्या फक्त चौकशी सुरू आहे. तूर्तास, मी या प्रकरणात काहीही बोलणार नाही. त्यामुळे सहकार्य करा.

आर्यनने ड्रग्ज घेतले नसले तरी त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल
सेलिब्रिटींची अनेक कायदेशीर प्रकरणे हाताळणारे वकील नितीन सातपुडे म्हणतात - आर्यन खानच्या अडचणी खूप वाढल्या आहेत. त्याने ड्रग्जचे सेवन केले असल्यास किंवा त्याच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले असल्यास एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. शिवाय त्याने ड्रग्जचे सेवन केले नसले किंवा ड्रग्ज बाळगले नसले तरीदेखील त्याच्याविरोधात कारवाई ही होणारच आहे. कारण जेव्हा रेव्हा पार्टी सुरु होती, तेव्हा आर्यन तिथे उपस्थित होता.

सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबी सुपर अ‍ॅक्टिव्ह
शनिवारच्या पार्टीनंतर ज्या लोकांवर कारवाई केली जात आहे त्यात काही प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे. असे म्हटले जात आहे की ,कॉर्पोरेट जगताव्यतिरिक्त नेत्यांची मुले देखील यात सामील होती. मात्र, एनसीबीने त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. चौकशी सुरु आहे. आर्यन त्याचा मित्र अरबाज मर्चंटसोबत रेव्ह पार्टीला गेला होता. अरबाज हा दिल्लीतील एका सुप्रसिद्ध व्यावसायिकाचा मुलगा आहे.

सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी कथितरित्या आत्महत्या केली. यानंतर एनसीबीने अनेक सेलेब्सची चौकशी केली होती, काहींना अटकही करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत 40 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी बहुतांश ड्रग्ज पेडलर आहेत.

बातम्या आणखी आहेत...