आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा26 वर्षीय इटालियन अभिनेत्री कॅरोल माल्टेसी हिच्या हत्येचा उलगडा झाला आहे. अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या पॉर्न स्टार कॅरोलची तिच्या प्रियकरानेच निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने जानेवारी महिन्यात हातोड्याने कॅरोलची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. इतकेच नाही तर त्याने मृतदेहाचे तुकडे करुन महिनाभर फ्रीजरमध्ये ठेवले होते. नंतर रस्त्याच्या कडेला कच-याच्या पिशवीत फेकून दिले. पोलिसांना मृतदेह एवढ्या वाईट अवस्थेत सापडला होता की, त्याची ओळख पटू शकली नाही.
चाहत्याने अभिनेत्रीच्या मृतदेहाची ओळख पटवली
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाचा फोटो प्रसिद्ध केला होता, ज्यामुळे पीडितेची ओळख पटू शकली. पॉर्न स्टारने पायावर एक टॅटू बनवला गेला होता, जो तिच्या एका चाहत्याने ओळखला. यानंतर पोलिसांनी तपास केला असता मृतकाच्या प्रियकराचे नाव समोर आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींनी सांगितले की, सेक्स केल्यानंतर त्यांच्यात कशावरून तरी भांडण झाले आणि या रागाच्या भरात कॅरोलची हत्या केली. आरोपी बँकर आणि फूड ब्लॉगर आहे.
नोकरी गमावल्यानंतर बनली स्ट्रगलिंग अभिनेत्री
कॅरोल 11 ते 13 मार्च दरम्यान एका फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करणार होती. मात्र तेथे न पोहोचल्याने तिच्या एका चाहत्याने पोलिसांना फोन करून तक्रार केली. कॅरोलबद्दल बोलायचे तर, ती मिलानच्या लोम्बार्डीच्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहात होती. ती पूर्वी परफ्यूमच्या दुकानात काम करायची, पण कोरोनानंतर तिची नोकरी गेली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.