आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

13 वर्षांची प्रतीक्षा:बोनी कपूरच्या चित्रपटाच्या रिलीजचा झाला एवढा उशीर की, अभिनेत्री दोन मुलांची आई झाली आणि अभिनेता निवृत्त झाला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2007 मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते.

'इट्स माय लाइफ' चित्रपटाला तब्बल 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रिलीजची तारीख मिळाली आहे. हा चित्रपट 29 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये नव्हे तर छोट्या पडद्यावर रिलीज होणार आहे. झी सिनेमावर हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. या 13 वर्षांत चित्रपटातील मुख्य कलाकारांचे आयुष्य खूपच पुढे गेले आहे. अभिनेत्री जेनिलिया डिसुजा-देशमुखचे लग्न झाले आणि ती दोन मुलांची आई झाली. तर अभिनेता हरमन बावेजाने जवळपास अभिनयातून संन्यास घेतला आहे. तर चित्रपटात हरमनच्या वडिलांच्या भूमिकेत झळकलेले नाना पाटेकरसुद्धा #MeTooमध्ये नाव आल्यानंतर अभिनयापासून दूर आहेत.

2007 मध्ये झाले होते चित्रपटाचे चित्रीकरण
अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शक तर बोनी कपूर निर्माते आहेत. हा चित्रपट तेलुगु फिल्म 'बोम्मारिल्लू'चा हिंदी रिमेक आहे. 2007 मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. परंतु अज्ञात कारणांमुळे हा प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटात हरमन, जेनिलिया आणि नाना पाटेकर यांच्याशिवाय कॉमेडियन कपिल शर्माचीही छोटी भूमिका आहे.