आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवांवर प्रतिक्रिया:अमिताभ यांची नात नव्या नवेली आणि जावेद जाफरींचा मुलगा मीजान रिलेशनशिपमध्ये? दोघांच्या नात्यावर जावेद जाफरी म्हणाले...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बालपणीचे मित्र आहे नव्या आणि मीजान

प्रसिद्ध अभिनेता आणि डान्सर जावेद जाफरी यांचा मुलगा मीजानने 2019 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी पासूनच त्याचे नाव अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाशी जोडले गेले आहे. अखेर या दोघांच्या नात्यावर जावेद यांनी मौन सोडले आहे. जावेद म्हणाले की लोकांना फक्त गॉसिप हवे असते. एखाद्याचा चांगला मित्र असणे नेहमीच काहीतरी वेगळे समजले जाते.

बालपणीचे मित्र आहे नव्या आणि मीजान

जावेद पुढे म्हणाले, 'ही मुले एकत्र मोठी झाली आहेत. दोघे शाळेपासूनचे मित्र आहेत आणि एकाच शाळेत शिकलेले आहेत. त्या दोघांचे फ्रेंड सर्कल देखील एकच आहे. सर्व मित्र-मैत्रिण मिळून रात्री 3 पर्यंत पार्ट्यासोबतच करतात. आणि ते दोघे फक्त चांगले मित्रच आहेत. ते कायम एकत्र दिसत असल्याने त्यांना लिंक करणे इतरांसाठी सोपे आहे. ज्याकाही चर्चा सुरू आहेत त्या खोट्या आहेत,' असे जावेद यांनी स्पष्ट केले. खरं तर नव्या आणि मीजान यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर एक नजर टाकली तर दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे दिसून येते. अलीकडेच नव्याच्या एका पोस्टवर मीजानने दिलेली कमेंट बघून तर अजूनच चर्चांना उधाण आले होते.

'हंगामा 2'मध्ये झळकणार आहे मीजान

मीजन लवकरच 'हंगामा 2' या चित्रपटात झळकणार आहे. तर दुसरीकडे नव्याने भारतातील महिला सबलीकरणावर पुढाकार घेऊन नेवेली हा प्रोजेक्ट सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...