आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

64 वर्षांचे झाले जग्गू दादा:हलाखीच्या परिस्थितीत गेले होते बालपण, 'हीरो' चित्रपट सुपरहिट झाल्यानंतरही चाळीत राहायचे जॅकी श्रॉफ

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंडस्ट्रीत पूर्ण झाली 38 वर्षे

हिंदी सिनेसृष्टीत 'शो मॅन' म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक सुभाष घई यांनी 1983 मध्ये 'हीरो' चित्रपट बनवला होता. हा फिल्म इंडस्ट्रीतील असा काळ होता, जेव्हा मोठ्या पडद्यावर अमिताभ बच्चन, धर्मेंद्र या सुपरस्टार्सची जादू चालत होती. अशा वातावरणात सुभाष घई यांनी एका अशा अभिनेत्याला हीरोच्या रुपात सादर केले जो पूर्णतः टपोरी होती, त्याची बोलण्याची स्टाईल बंबईया होती, त्याच्या चेह-यावर लांब केसांसह दाढी आणि मिशी वाढलेली होती. अशा रुपातला तरुण सुभाष घई यांच्या 'हीरो' चित्रपटाला यश मिळवून देऊ शकेल का? याविषयी शंका उपस्थित करण्यात आली होती. मात्र तरीदेखील सुभाष घई यांनी त्याला जॅकी नावाने लाँच करत फिल्म इंडस्ट्रीचा 'हीरो' बनवले. 'हीरो' या चित्रपटात जॅकीची भूमिका ज्या अभिनेत्याने साकरली होती, त्याला सर्वजण जॅकी श्रॉफ या नावाने ओळखतात. आज जॅकी दादांचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 64 वर्षे पूर्ण केली आहेत.

आज जॅकी दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी सांगत आहोत...

खरे नाव
1983 साली 'हीरो' चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या जॅकी श्रॉफ यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1957 रोजी गुजराती कुटुंबात झाला होता. जॅकी दादांचे पूर्ण नाव जय किशन श्रॉफ असे आहे. चित्रपटात झळकण्यापूर्वी जॅकी यांनी काही जाहिरातीत काम केले होते. मात्र 'हीरो' या चित्रपटानंतर त्यांचे करिअर यशोशिखरावर पोहोचले. त्यांचे फिल्मी करिअर आजही सुरु आहे.

चाळीत गेले बालपण
जॅकी श्रॉफ फिल्म इंडस्ट्रीतील असे अभिनेते आहेत, ज्यांचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. ते मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील तीन बत्ती नावाच्या चाळीत राहात होते. बालपणी ते चित्रपटांच्या प्रदर्शनाची आणि निवडणुकींची वाट बघायचे. कारण या काळात त्यांना भींतीवर पोस्टर्स चिकटवायचे काम मिळायचे. याशिवाय ते एक्स्ट्रा इनकमसाठी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी झेंडा वंदनासाठी आलेल्या लोकांना चने विकायचे. यातून जे पैसे मिळायचे त्यातून ते रविवारी चंदू हलवाईकडून जलेबी खरेदी करुन खायचे.

'हीरो' या चित्रपटाने बदलले नशीब
सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ यांना 'हीरो' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये लाँच केले. या सिनेमात त्यांचे नाव जॅकी होते. जॅकी श्रॉफ यांच्या या सिनेमाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने त्याकाळी तब्बल 12 कोटी 50 लाखांचा व्यवसाय केला होता.

2016 मध्ये जॅकी यांचा मुलगा टायगरने वडिलांच्या संघर्षाविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. त्याने सांगितल्यानुसार, हीरो या चित्रपटानंतर त्याच्या वडिलांच्या पदरी यश आले, मात्र त्यांनी कधीही स्वतःवर स्टारडमची नशा चढू दिली नाही. ते चाळीत राहायचे. आणि चित्रपट रिलीज झाल्यानंतरही पाच ते सहा वर्ष ते वाळकेश्वरच्या तीन बत्ती या चाळीतच राहिले होते. चाळीत त्यांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागायचा.

'स्वामी दादा'ने केली होती सुरुवात
जॅकी श्रॉफ यांचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट 'हीरो' होता. मात्र त्यापूर्वी त्यांनी 'स्वामी दादा' या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. 1983 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात जॅकी देव आनंद यांच्यासह झळकले होते.

इंडस्ट्रीत पूर्ण झाली 38 वर्षे
जॅकी श्रॉफ यांना आपल्या करिअरची सुरुवात करुन 38 वर्षे पूर्ण झाली आहेत. याकाळात त्यांनी 220 चित्रपटांमध्ये काम केले. यात त्यांच्या 'कर्मा', ‘खलनायक’, ‘राम-लखन’, ‘सौदागर’, ‘बॉर्डर’, ‘रंगीला’ या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. जॅकी यांनी ‘बागी 3’, ‘भारत’, ‘क्रिमिनल जस्टिस’ या चित्रपटांमध्येही झळकले. आता ते लवकरच ‘सूर्यवंशी’ आणि ‘राधे’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.