आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठरलं तर...:'ओम: द बॅटल विदीन'मध्ये झाली जॅकी श्रॉफची एंट्री, साकारणार आदित्य रॉय कपूरच्या वडिलांची भूमिका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्य आणि जॅकी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन स्पेस शेअर करताना दिसतील.

अभिनेता आदित्य रॉय कपूरने मागील वर्षी डिसेंबरमध्ये त्याच्या आगामी 'ओम: द बॅटल विदीन' या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. पोस्टरमध्ये आदित्यच्या रफ आणि टफ लूकचे कौतुक केले गेले. 'ओम' या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटात आता अभिनेते जॅकी श्रॉफ यांची एंट्री झाली आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटात जॅकी आदित्यच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने आदित्य आणि जॅकी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन स्पेस शेअर करताना दिसतील.

कपिल वर्मा दिग्दर्शित ‘ओम: द बॅटल विदीन’ या चित्रपटत आदित्यसह दिल बेचारा फेम संजना सांघी झळकणार आहे. तर अहमद खान या चित्रपटाचे निर्माते आहेत.

तारा सुतारिया आणि दिशा पाटनीला मागेत टाकत संजनाची लागली वर्णी संजना 'दिल बेचारा'नंतर प्रकाशझोतात आली. आता ओम या चित्रपटातही संजना मुख्य भूमिकेत दिसणार असून 'दिल बेचारा'नंतरचा हा तिचा दुसराच चित्रपट आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अहमद खान नवीन चेह-याचा शोध घेत होते. त्यांना फ्रेश फेस हवा होता, शिवाय आदित्यसोबतची अभिनेत्रीची केमिस्ट्रीदेखील जुळणारी हवी होती. त्यांना संजना या भूमिकेसाठी परफेक्ट वाटली. संजना आदित्यच्या प्रेयसीची भूमिका वठवणार असून चित्रपटात अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. संजनाने 'ओम' हा चित्रपट साइन केला आहे.

या चित्रपटासाठी संजनाच्या आधी तारा सुतारिया, दिशा पाटनी यांच्या नावांची चर्चा होती. 2021 च्या सुरुवातीला अहमद यांना हा चित्रपट पूर्ण करायचा आहे. त्यामुळे ते तारा आणि दिशाच्या तारखांची वाट बघू शकत नव्हते. कारण या दोघीही दुस-या चित्रपटांमध्ये बिझी आहेत. तर संजनाच्या हातात सध्या दुसरा कुठलाही मोठा चित्रपट नव्हता. त्यामुळे तिची निवड या चित्रपटासाठी झाली. हा चित्रपट या उन्हाळ्यात थिएटरमध्ये दाखल होईल अशी अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...