आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:37 वर्षांपर्यंत जॅकी श्रॉफचे मेकअप आर्टिस्ट राहिलेले शशी साटमचे निधन, अभिनेत्याने दु:ख व्यक्त करताना म्हटले - शशीदादा तुम्ही नेहमीच माझ्या हृदयात राहाल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील वर्षी लॉकडाउननंतर आजारी पडले होते शशी साटम

बॉलिवूडचे सीनियर मेकअप आर्टिस्ट शशी साटम यांचे साेमवारी स्ट्रोकमुळे निधन झाले. याची माहिती जॅकी श्रॉफ यांनी मंगळवारी सोशल मीडियावर दिली. जॅकी यांनी सांगितले की, शशी साटम गेल्या 37 वर्षापासूनप त्यांच्यासोबत काम करत होते.​​​​​​

शशीदादा तुम्ही नेहमीच माझ्या हृदयात राहाल
जॅकी श्रॉफ यांनी शशी साटमसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, “शशी दादा तुम्ही नेहमीच माझ्या हृदयात राहाल. 37 वर्षापासून माझे मेकअप आर्टिस्ट राहिलेले शशी दादा यांचे निधन झाले आहे.'' जॅकीनंतर त्यांची पत्नी आयशा श्रॉफनेदेखील शशी सातम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मागील वर्षी लॉकडाउननंतर आजारी पडले होते शशी साटम
रिपोर्ट्सनुसार, शशी साटम गेल्या वर्षी लॉकडाउननंतर आजारी पडले होते. याशिवाय मागील बुधवारी ते बाथरुममध्ये पडले होते. त्यानंतर त्यांना स्ट्रोक आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती.

शशी साटम यांनी जॅकी श्रॉफसोबत 'हीरो'सह अनेक चित्रपटांत केले काम
आपल्या करिअरमध्ये शशी साटम यांनी 90 आणि 2000 च्या दशकात ऋषी कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्यासह अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले. जॅकी श्रॉफसोबत त्यांनी 'हीरो', '1945: ए लव स्टोरी', 'परिंदा', 'मेरा धर्म', 'कर्ज', 'तेरी मेहरबानियां', 'मेरा जवाब', 'क्यों की', 'हलचल'सह ब-याच चित्रपटांसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...