आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo:फोटोग्राफर कॉलस्टन आणि निर्माता जॅकी भगनानीसह 9 जणांविरोधात FIR, मॉडेलने लावला बलात्कार आणि छळ केल्याचा आरोप

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोग्राफर कॉलस्टन जूलियन आणि जॅकी भगनानी. - Divya Marathi
फोटोग्राफर कॉलस्टन जूलियन आणि जॅकी भगनानी.
  • चार वर्षात कॉलस्टनने अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप मॉडेलने केला आहे.

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा #MeToo चे वादळ घोंगावू लागले आहे. मुंबईमध्ये एका माजी मॉडेलने बॉलिवूडमधील प्रसिद्ध नऊ व्यक्तींवर बलात्कार आणि छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यात अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी, कंगना रनोट स्टारर 'थलायवी'चे निर्माते विष्णु वर्धन इंदुरी, प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन जूलियन आणि क्वान एंटरटेन्मेंटचे को-फाउंडर अनिर्बान दास ब्लाहसह अनेक बड्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे.

फोटोग्राफरवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप
या मॉडेलने मुंबईतील वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अन्य लोकांमध्ये टी-सीरीजचे कृष्ण कुमार, निखिल कामत, शील गुप्ता, अजीत ठाकूर आणि गुरुज्योत सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. पीडितेने फोटोग्राफर कॉलस्टन जूलियनवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तर अभिनेता जॅकी भगनानीसह आठ जणांवर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

मॉडेलने केलेल्या आरोपांची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मॉडेलच्या आरोपानुसार ती मुंबईत करिअर करण्यासाठी आली होती. यावेळी 2014 ते 2018 या चार वर्षांच्या काळात फोटोग्राफर कॉलस्टनने अनेकदा वेळा तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. मात्र कृष्ण कुमार आणि कॉलस्टन यांनी हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. कॉलस्टनने या मॉडेलविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचेही म्हटले आहे.

18 मे रोजी नोंदवण्यात आला पीडितेचा जबाब
पीडितेने 18 मे रोजी आपला जबाब नोंदवला आहे. अभिनेता जॅकी भगनानीने वांद्रे येथे या मॉडेलचे शोषण केल्याचे एअआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. तर नखिल कामतने सांताक्रूजमधईल एका हॉटेलमध्ये तिचा विनयभंग केला. रिपोर्ट्सनुसार, जॅकी भगनानी सध्या भारतात नाहीये. तो सप्टेंबर महिन्यात मुंबईत परतणार आहे.

बातम्या आणखी आहेत...