आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यू प्रोजेक्ट:रोहितसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे जॅकलिन फर्नांडिस, रणवीर सिंगसोबत करणार सिल्व्हर स्क्रिनवर रोमान्स

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 नोव्हेंबर रोजी डलहौसीला जाण्यापूर्वी जॅकलिन ‘सर्कस’चे वाचन सत्र पूर्ण केले आहे.

जॅकलिन फर्नांडिस शनिवारी हिमाचल प्रदेशाला रवाना झाली. ती धर्मशाला आणि डलहौजीमध्ये ‘भूत पुलिस’चे शूटिंग करणार आहे. तेथे तिच्यासोबत सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूरदेखील सोबत आहेत. चित्रपटाच्या शूटिंगमुळे त्यांची दिवाळीदेखील कामातच जाणार आहे. तेथे 45 दिवसांचे शूटिंग ठेवण्यात आले आहे. तेथे शूटिंग संपेपर्यंत हे कलाकार काम करणार आहोत. यात जॅकलिन एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे.

डलहौसीला रवाना झालेली भूत पोलिसची टीम
डलहौसीला रवाना झालेली भूत पोलिसची टीम

'भूत पोलिस'ची ही असेल कथा
चित्रपटाच्या एका सूत्रांनी सांगितले, यात यामी आणि जॅकलिन बहिणीच्या भूमिकेत आहेत. यामीचा खून होतो आणि जॅकलिन ते रहस्य उघड करते. यात तिची मदत सैफ आणि अर्जुनचे पात्र करतात. मृत्यूनंतर यामीच्या पात्राची आत्मा जॅकलिनची मत करत. अर्जुन आणि सैफ यात भूत पकडणा-या पोलिस दलात काम करत असतात.

'सर्कस'मध्ये रणवीरसोबत झळकणार जॅकलिन
यानंतर डिसेंबरमध्ये जॅकलीन रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’चे काम करणार आहे. हा चित्रपट 'अंगूर'चा रिमेक आहे. याविषयी जॅकलीने सांगितले, “लोकांना हसवणे आणि खुश ठेवणे खूपच अवघड काम आहे. मात्र या कामात रोहित शेट्टी पारंगत आहे. जेव्हा कधी मनोरंजक आणि व्यावयासिक सिनेमाचा विषय येतो, तेव्हा मला रोहित शेट्टीचे नाव आठवते. त्याच्यासोबत काम करण्यास मी खूपच उत्सुक आहे. सेटवर जाण्याची वाट पाहत आहे.

4 नोव्हेंबर रोजी डलहौसीला जाण्यापूर्वी जॅकलिन ‘सर्कस’चे वाचन सत्र पूर्ण केले आहे. यात ती 'अंगूर'मधील मौसमी चॅटर्जी यांची भूमिका मॉर्डन रोलमध्ये सादर करणार आहे. या दोघांव्यतिरिक्त जुन्या 'अर्थ'च्या रिमेक मध्येही जॅकलिन असल्याची बातमी आहे. मात्र आता त्यात काही बदल करण्यात आला आहे. त्याचे निर्माते चेन्नईमध्ये शूटिंग करणार आहेत. दक्षिणेची रेवती याचे दिग्दर्शन करणार आहे. जॅकलिनच्या तारखांमुळे सध्या गोंधळ उडाला आहे. त्यामुळे तिच्या जागी दुस-या कुणालाही घेतले जाऊ शकते.