आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चौकशीसाठी आज ईडीच्या दिल्ली कार्यालयात पोहोचली. जॅकलिन सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील महत्त्वाची साक्षीदार आहे. या प्रकरणी ईडीने जॅकलिनला तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. सुकेश दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. रविवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर जॅकलिनला परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले होते. ती सलमान खानच्या 'द-बँग' टूरसाठी रियाधला जात होती. या प्रकरणी ईडीने अभिनेत्री नोरा फतेहीचीही चौकशी केली आहे.
जॅकलिन ही महत्त्वाची साक्षीदार
ईडीच्या म्हणण्यानुसार, सुकेशच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन महत्त्वाची साक्षीदार आहे. जॅकलिन सुकेशला डेट करत होती, असा आरोप आहे. यादरम्यान कॉनमॅन सुकेशने जॅकलिनला अनेक महागडे गिफ्ट्स दिले. यात दागिन्यांसह क्रॉकरी, 4 पर्शियन मांजरी आणि एक घोडा देण्यात आला आहे. एका पर्शियन मांजरीची किंमत 9 लाख रुपये आहे. त्याचबरोबर घोड्याची किंमत 52 लाख रुपये आहे.
ईडीला मिळाले आहेत पुरावे
जॅकलिन आणि सुकेश यांच्यातील जवळीक सिद्ध करणाऱ्या फोटोंसह अनेक पुरावे ईडीला मिळाले आहेत. याआधी जॅकलिनचीही ईडीने ऑगस्टमध्ये चौकशी केली होती. या प्रकरणी सुकेश चंद्रशेखर, त्यांची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर 6 जणांविरुद्ध 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सुकेश चंद्रशेखर फसवणुकीचा मास्टरमाईंड
सुकेश आणि इतरांविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुकेश चंद्रशेखर हा या फसवणुकीचा सूत्रधार असल्याचे ईडीने छापेमारीनंतर सांगितले होते. वयाच्या 17 व्या वर्षापासून तो गुन्हेगारी जगताचा भाग आहे. ईडीने 24 ऑगस्ट रोजी सुकेशचा चेन्नईतील सी-फेसिंग बंगला जप्त केला होता. बंगल्यातून 82.5 लाख रुपये, 2 किलो सोने आणि 12 पेक्षा जास्त आलिशान कार जप्त करण्यात आल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.