आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकलिनच्या जामिनावर आता पुढच्या आठवड्यात येणार निर्णय:15 नोव्हेंबरपर्यंत कोर्टाचा निर्णय सुरक्षित

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुकेशच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन महत्त्वाची साक्षीदार आहे.

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या जामीन अर्जावर आता 15 नोव्हेंबरला निर्णय येणार आहे. या प्रकरणी शुक्रवारी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान जॅकलिनही कोर्टात हजर होती. 15 नोव्हेंबरला जॅकलिनला जामिन मिळणार की तिला अटक होणार हे स्पष्ट होणार आहे.

यापूर्वी गुरुवारी झाली होती सुनावणी

यापूर्वी गुरुवारी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली होती. यादरम्यान देखील जॅकलिन कोर्टात हजर होती. विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी ईडी आणि जॅकलिन यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अंतरिम जामिनावरील निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवला होता. पण आता हा निर्णय 15 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर पडला आहे.

याप्रकरणी मी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केल्याचे जॅकलिनने न्यायालयात सांगितले होते. मी स्वत: या प्रकरणात आत्मसमर्पण केले आहे, परंतु ईडीने मला फक्त त्रास दिला आहे, असा आरोप जॅकलिनने केला होता. यादरम्यान ईडीने म्हटले होते की, त्यांच्याकडे जॅकलिनविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळे त्यांना नियमित जामीन देऊ नये.

ED च्या चौकशीवर जॅकलिन म्हणाली - सर्व आरोप निराधाक

10 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत जॅकलिन कोर्टरूममध्ये आपला बचाव करताना म्हणाली, 'मी याप्रकरणी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले आहे. मी स्वत: या प्रकरणात आत्मसमर्पण केले आहे, परंतु EDने मला फक्त त्रास दिला आहे. मी माझ्या कामानिमित्त परदेशात जात राहते, पण मला परदेशात जाण्यापासून रोखले गेले. मला माझ्या कुटुंबीयांनाही भेटू दिले जात नाही. मी या सर्व गोष्टींसाठी तपास यंत्रणेला ईमेल केला होता, पण त्याचेही उत्तर आले नाही. त्यांनी आरोप केला की, मी देश सोडून पळून जाणार आहे. मग त्यांनी मला LOC (लुक आऊट सर्कुलर) जारी करून थांबवले. EDचे सर्व आरोप निराधार आहेत.'

ईडीचा जामिनाला विरोध, म्हणाले - जॅकलिन श्रीलंकेला पळून जाऊ शकते
EDच्या वतीने वकिलाने सांगितले की, जॅकलिन ही परदेशी नागरिक आहे. तिचे कुटुंब श्रीलंकेत राहते. जॅकलिनने डिसेंबर 2021 मध्येही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. 22 ऑक्टोबर रोजी पटियाला हाऊस कोर्टाने जामीन याचिकेवर सुनावणी करताना जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर केला होता.

22 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीसाठी जॅकलिन वकिलाच्या कपड्यात कोर्टात पोहोचली होती, जेणेकरून तिला कोणी ओळखू नये.
22 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीसाठी जॅकलिन वकिलाच्या कपड्यात कोर्टात पोहोचली होती, जेणेकरून तिला कोणी ओळखू नये.

त्यानंतरही EDने जामीन निर्णयाला विरोध केला होता. एजन्सीने आरोप केला होता की, जॅकलिनने कधीही तपासात सहकार्य केले नाही, पुरावे समोर आल्यानंतरच सर्व खुलासे झाले आहेत. EDने असेही म्हटले आहे की, तिने भारतातून पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला होता, परंतु LOC जारी ती असे करू शकली नाही.

जॅकलिन-सुकेश होते रिलेशनशिपमध्ये, ED च्या चौकशीत दिली होती कबुली
प्रकरणाच्या सुरुवातीलाच जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा होत्या. बातम्यांनुसार, जॅकलिनला डेट करत असताना सुकेशने तिला महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याशिवाय सुकेशने तिला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले. या रिंगमध्ये J आणि S बनवले गेले. सुकेशने जॅकलिनच्या फॅशन डिझायनर लिपाक्षीच्या खात्यावर 3 कोटी रुपयेही पाठवले होते. या पैशातून लिपाक्षीने डिझायनर कपडे, कार आणि जॅकलिनच्या आवडीचे गिफ्ट्स तिला दिले होते. ईडीच्या चौकशीदरम्यान जॅकलिनने तिचे नातेसंबंध आणि भेटवस्तू मिळाल्याची कबुली दिली होती.

जॅकलिन-सुकेशचे खासगी फोटो समोर आले होते. त्यावेळी ईडीने हे फोटो पुरावा म्हणून ठेवले होते.
जॅकलिन-सुकेशचे खासगी फोटो समोर आले होते. त्यावेळी ईडीने हे फोटो पुरावा म्हणून ठेवले होते.

EDचा दावा - जॅकलिनला सुकेशचे वास्तव माहिती होते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, EDचा असा विश्वास आहे की, जॅकलिनला पहिल्यापासूनच माहिती होते की या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर हा फसवणूक करणारा आहे आणि तो खंडणीखोरी करतो. त्यांचे अनेक खासगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर EDने जॅकलिनची चौकशी केली आणि दोघांचे फोटो पुरावे म्हणून ठेवले.

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन मुख्य साक्षीदार
गेल्या वर्षी, ED ने सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरुद्ध 200 कोटी रुपयांच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. आरोपानुसार, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना सुकेशने रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मलविंदर सिंग यांची पत्नींची 200 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती.

ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत जॅकलिनचे जबाबही नोंदवले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार सुकेशच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन महत्त्वाची साक्षीदार आहे.

बातम्या आणखी आहेत...