आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँडरिंग केस:जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा ईडीच्या चौकशीला गैरहजर, 200 कोटींच्या वसुली प्रकरणातील आहे साक्षीदार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीने काही दिवसांपूर्वीच मनी लाँडरिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा जबाब नोंदवला होता.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस शनिवारी तिस-यांदा ईडी (अंमलबजावणी संचालनालय)च्या चौकशीला गैरहजर राहिली. तिहार कारागृहातून 200 कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर आणि लीना पॉल प्रकरणी जॅकलिनची काही दिवसांपूर्वी दिल्लीत सहा तास चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणाच्या चौकशीसाठी जॅकलिनला शनिवारी ईडीसमोर हजर रहावे लागणार लागणार होते. मात्र जॅकलिन या चौकशीसाठी गैरहजर राहिली. यापूर्वी 25 सप्टेंबर रोजी देखील जॅकलिन गैरहजर होती.

'राम सेतू'च्या चित्रीकरणात बिझी आहे जॅकलिन
जॅकलिनने आपल्या सोशल मीडियावर ऊटीचा फोटो शेअर केला आहे. यात ती अक्षय कुमारसह दिसत आहे. ती अक्षयसह आनंद एल राय यांच्या 'राम सेतू'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. जॅकलिनने तिच्या प्रोफेशनल आयुष्यातील कमिटमेंट्समुळे चौकशीला गैरहजर राहत असल्याचे सांगितले. शुक्रवारी जॅकलिनने पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी बोलावण्याची विनंती केली आहे.

या प्रकरणातील साक्षीदार आहे जॅकलिन
30 ऑगस्ट रोजी जॅकलिनची दिल्लीत सहा तास चौकशी करण्यात आली होती. तिचे निवेदन मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) साक्षीदार म्हणून रेकॉर्ड करण्यात आले होते. सुकेश चंद्रशेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पाल तिहार कारागृहातून 200 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात तुरुंगात आहेत.

सुकेशने दिल्लीच्या तिहार कारागृहातून नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. 200 कोटींच्या खंडणीचा मुख्य आरोपी सुकेश तिहार कारागृहातून अभिनेत्री जॅकलिनला फोन करायचा. सुकेश तिहार कारागृहातून कॉल स्पूफिंग सिस्टीमद्वारे अभिनेत्रीला फोन करायचा. पण त्याने आपली ओळख उघड केली नाही. एजन्सींना सुकेश चंद्रशेखरचे महत्त्वाचे कॉल डिटेल्स मिळाले आहेत. याद्वारे तपास यंत्रणांना जॅकलिनसोबत झालेल्या फसवणुकीची माहितीही मिळाली. सुकेश या प्रकरणातील मास्टर माइंड असून तो वयाच्या 17 व्या वर्षीपासून गुन्हेगारीत सामील आहे.

बातम्या आणखी आहेत...