आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सुनावणीसाठी पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली आहे. जॅकलीन प्रत्येक वेळेप्रमाणे या वेळीही फॉर्मल कपड्यांमध्ये पोहोचली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज कोर्ट महाठग सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीनवर आरोप निश्चित करणार आहे. कोर्टाने जॅकलिनवर आरोप निश्चित केले तर तिची कोर्टात हजेरी सुरूच राहणार आहे. मात्र, न्यायालयात सुनावणीदरम्यान काय झाले, याबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.
जॅकलिनने मागितली होती प्रवासाची परवानगी
काही दिवसांपूर्वी जॅकलिनने तिच्या आजारी आईला भेटण्यासाठी परदेशात जाण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. परंतु नंतर तिने अर्ज मागे घेतला. वास्तविक, न्यायालयाचे म्हणणे आहे की हे प्रकरण गंभीर टप्प्यावर आहे, त्यामुळे त्यांना परदेशात जाण्याची परवानगी देता येणार नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हा अर्ज मागे घेऊ शकता किंवा न्यायालयाकडून न्यायालयीन आदेश मागू शकता, असे न्यायालयाने म्हटले होते. यावर जॅकलिनने आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन महत्त्वाची साक्षीदार
गेल्या वर्षी, ईडीने सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरुद्ध 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. आरोपानुसार, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना सुकेशने रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंह आणि मलविंदर सिंह यांच्या पत्नींची 200 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती.
EDने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत जॅकलिनचे जबाबही नोंदवले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, सुकेशच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन महत्त्वाची साक्षीदार आहे.
रिलेशनशिपमध्ये होते जॅकलिन-सुकेश, जॅकलिनने ईडीच्या चौकशीत दिली कबुली
या प्रकरणाच्या सुरुवातीला जॅकलीन आणि सुकेश यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. सुकेशला डेट करत असताना तिला सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामध्ये दागिने, क्रोकरी, 4 पर्शियन मांजरी आणि एक घोडा यांचा समावेश होता. पर्शियन मांजरीची किंमत 9 लाख रुपये आहे. तर घोड्याची किंमत ५२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
याशिवाय सुकेशने तिला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. या रिंगमध्ये J आणि S बनवले गेले होते. सुकेशने जॅकलिनच्या फॅशन डिझायनर लिपाक्षीच्या खात्यावर 3 कोटी रुपयेही पाठवले. या पैशातून लिपाक्षीने जॅकलिनच्या पसंतीचे डिझायनर कपडे, कार आणि गिफ्ट्स तिला पाठवले होते. ईडीच्या चौकशीत जॅकलिनने तिचे नातेसंबंध आणि भेटवस्तू मिळाल्याची कबुली दिली.
ईडीचा दावा- जॅकलिनला सुकेशची वास्तविकता माहीत होती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीचा असा विश्वास आहे की जॅकलिनला सुरुवातीपासूनच माहित होते की या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर हा ठग आहे आणि तो खंडणी घेतो. त्याचे अनेक खासगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर ईडीने जॅकलिनची चौकशी केली आणि दोघांचे फोटो पुरावे म्हणून ठेवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.