आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकलिनचा वाईट काळ:जॅकलिन फर्नांडिसची आई किम यांना हृदयविकाराचा झटका, बहरीनमधील रुग्णालयात दाखल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जॅकलिनचे आई-वडील गेल्या काही वर्षांपासून बहरीनमध्ये राहत आहेत.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससाठी 2021 हे वर्ष फारसे चांगले गेले नाही. परंतु 2022 ची नवीन वर्षाची सुरुवातही तिच्यासाठी चांगली ठरली नाही. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची आई किम फर्नांडिस यांना बहरीनमध्ये हृदयविकाराचा झटका आला आहे. जॅकलिनचे आई-वडील गेल्या काही वर्षांपासून बहरीनमध्ये राहत आहेत. हृदयविकाराचा झटक्यानंतर किम यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जॅकलिनने बहरीनला यावे अशी होती आई-वडिलांची इच्छा
जॅकलिन फर्नांडिसने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, कोरोना महामारीमुळे तिचे पालक तिच्याबद्दल खूप चिंतेत आहेत आणि तिने बहारीनला जावे अशी त्यांची इच्छा आहे. जॅकलिन म्हणाली होती- 'श्रीलंकेतील माझे मित्र आणि बहरीनमध्ये राहणारे माझे आई-वडील बातम्यांमध्ये जेव्हा भारताची स्थिती बघतात तेव्हा ते घाबरतात. माझ्या आई-वडिलांची इच्छा आहे की मी बहारीनमध्ये त्यांच्यासोबत रहावे... श्रीलंकेतील माझे काका आणि चुलत भाऊही मला त्यांच्यासोबत राहण्यास सांगत आहेत." जॅकलिन मात्र तिच्या वर्क कमिटमेंटमुळे भारतातच राहिली.

कॉनमॅनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली जॅकलिन
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतच्या संबंधांमुळे आणि व्हायरल झालेल्या फोटोंमुळे जॅकलिन अलीकडेच चर्चेत आली होती. वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर जॅकलिन सध्या अक्षय कुमार आणि नुसरत भरूचा स्टारर 'राम सेतू' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. याशिवाय ती अक्षय आणि कृती सेननसह 'बच्चन पांडे', रणवीर सिंगच्या 'सर्कस'मध्ये दिसणार आहे. सर्कसचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे. इतकंच नाही तर जॅकलिन जॉन अब्राहमसोबत 'अटॅक'मध्येही दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...