आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकलिन फर्नांडिसची 14 सप्टेंबरला होणार चौकशी:EOW ने जारी केले नवीन समन्स, 12 सप्टेंबरला होती गैरहजर

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आता 14 सप्टेंबरला चौकशी होणार आहे. दिल्ली पोलिसांच्या EOW शाखेने नवीन समन्स जारी केले आहे. जुन्या कमिटमेंट्समुळे 12 सप्टेंबर रोजी जॅकलिन चौकशीला उपस्थित राहू शकली नाही.

नवीन समन्स जारी करणार - पोलिस अधिकारी
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले - जॅकलिनने आमच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधला होता. ती 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील मंदिर मार्गावरील ईओडब्ल्यू कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार होती. मात्र त्यापूर्वी ठरलेल्या वेळापत्रकाची माहिती देत ​​चौकशी पुढे ढकलण्याची तिने मागणी केली. त्यामुळे आम्ही आता जॅकलिनला नव्याने समन्स बजावणार आहोत.

जॅकलिन-सुकेश रिलेशनशिपमध्ये होते
मीडिया रिपोर्ट्सनुरास ईडीच्या मते, सुकेश फसवणुक करणारा आहे, हे जॅकलिनला आधीपासूनच ठाऊक होते. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे अनेक खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर ईडीने जॅकलिनची चौकशी केली होती आणि दोघांचे फोटो पुरावा म्हणून ठेवले.

सुकेशच्या गिफ्ट्समुळे अडचणीत आली जॅकलिन
रिपोर्टनुसार, जॅकलिनने चौकशीदरम्यान सांगितले की, मी सुकेशकडून कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू घेतल्या होत्या. कारण आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. सुकेशने मला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. या रिंगमध्ये J आणि S बनवले होतेले. सुकेशने जॅकलिनला एस्पुएला नावाचा घोडा, गुच्चीच्या 3 डिझायनर बॅग, गुच्चीच्या 2 जिम वेअर, लुई विटॉचे एक जोडी शूज, 2 जोडी डायमंड कानातले आणि एक रुबी ब्रेसलेट, दोन हेमीज ब्रेसलेट आणि एक मिनी कूपर कारचा समावेश आहे.

कोण आहे कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर?
सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरू येथील रहिवासी आहेत. लॅव्हिश लाइफस्टाइल जगण्यासाठी त्याने वयाच्या 17 व्या वर्षापासून लोकांची फसवणूक सुरू केल्याचे सांगितले जाते. बंगळुरूमध्ये फसवणूक केल्यानंतर त्याने चेन्नई आणि इतर शहरातील लोकांनाही टार्गेट केले.

सुकेश हा उच्चभ्रू लोकांना फोन करायचा आणि स्वतः मोठा सरकारी अधिकारी असल्याचे सांगायचा. 2007 मध्ये त्याने बंगळुरू डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात 100 हून अधिक लोकांची फसवणूक त्याने केली होती, यावेळी त्याने स्वत:ला बडा सरकारी अधिकारी असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी सुकेशला अटकही करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर सुकेशने पुन्हा लोकांना फसवण्याचे काम सुरू ठेवले. सुकेशवर 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

तामिळनाडूमध्ये तो स्वत:ला माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचा मुलगा असल्याचे सागंत होता. त्याने स्वतःला आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचा पुतण्या असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...