आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकलिन फर्नांडिसची लव्ह लाइफ:बहरीनचा प्रिन्स होता पहिला बॉयफ्रेंड, 15 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शक साजिद खानसोबतही होते अफेअर

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी सुरू आहे. जॅकलिनला या प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करायचे होते. सुकेशने जॅकलिनला एस्पुएला नावाचा 50 लाखांचा घोडा आणि 9-9 लाख रुपयांच्या मांजरी भेट दिल्या होत्या. 3 डिझायनर बॅग, 2 Gucci जिम वेअर, लुई विटॉनची एक शू जोडी, डायमंड कानातले, एक रुबी ब्रेसलेट, दोन हर्मीस ब्रेसलेट आणि एक मिनी कूपर कार सुकेशने जॅकलिनला भेट दिली होती. सुकेशसोबतच्या नात्यामुळे जॅकलिन वादात सापडली आहे.

सुकेशच्या आधीही जॅकलिनचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले आहे. तर जाणून घेऊया-

शेख हसन बिन रशीद

जॅकलिनचे नाव बहरीनचे राजकुमार हसन बिन राशिद अली खलिफा यांच्याशीही जोडले गेले होते. ही अभिनेत्री प्रिन्ससोबत 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये होती, पण बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर जॅकलिनने त्याच्यासोबतचे नाते संपुष्टात आणले होते. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत झाली होती. जॅकलिनची साजिदसोबतची वाढती जवळीक हे या दोघांच्या ब्रेकअपचे कारण असल्याचीही चर्चा होती.

साजिद खान

साजिद खान आणि जॅकलिनच्या रिलेशनशिपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. साजिद जॅकलिनपेक्षा 15 वर्षांनी मोठा होता. दोघांनी जवळपास 2 वर्षे एकमेकांना डेट केले होते. जॅकलिनच्या करिअरला ग्रूम करण्यात साजिदचा मोठा हात असल्याचे मानले जात होते. याच कारणामुळे अभिनेत्रीला हाऊसफुल 1 आणि हाऊसफुल 2 सारख्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 2012 मध्ये दोघेही लग्न करणार असल्याची बातमीही आली होती, पण जॅकलिनने साजिदसोबतचे नाते तोडले. चित्रपटांतील भूमिकांपासून ते जॅकलिनच्या कपड्यांपर्यंत सर्वकाही साजिदच ठरवायचे, असे म्हटले जाते. या वागण्यामुळे 2013 मध्ये जॅकलिनने त्याच्यासोबत ब्रेकअप केले होते.

सलमान खान

किक चित्रपटाच्या सेटवर सलमान खान आणि जॅकलिनच्या नात्याची अफवा सुरु झाली होती. या दोघांमध्ये काहीही नसल्याचेही बोलले जात होते. सलमान जॅकलिनला फक्त एक चांगली मैत्रीण मानतो आणि त्याने जॅकलिनचे करिअर घडवण्यासाठी तिला मदत केली आहे. जॅकलिननेसुद्धा एका मुलाखतीत हेच सांगितले होते की, ती आणि सलमान फक्त चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यात काहीही नाही.

सिद्धार्थ मल्होत्रा

जॅकलिनचे नाव काही काळ सिद्धार्थसोबत जोडले गेले होते. जेंटलमेंट या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. कॉफी विथ करण या शोमध्ये दोघेही एकत्र दिसले होते. आलिया भट्ट आणि सिद्धार्थच्या ब्रेकअपमागे जॅकलिन कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही अधिकृतपणे काहीही सांगितले नव्हते.

मिशेल मोरोन

जॅकलिन मिशेलसोबत 'मुड मुड के देख' या म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. म्युझिक अल्बममधील दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती, त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या वृत्ताला उधाण आले होते.

बातम्या आणखी आहेत...