आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जॅकलिनचा नवीन पत्ता:प्रियांका चोप्राच्या जुन्या घरी शिफ्ट झाली जॅकलिन फर्नांडिस, किंमत आहे 7 कोटी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियांकाने ज्यांना विकले त्यांच्याकडून जॅकलिनने भाड्याने घेतले

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस प्रियांका चोप्राच्या जुन्या घरात शिफ्ट झाल्याची बातमी आहे. या घराची किंमत सुमारे 7 कोटी असल्याचे सांगितले आहे. हे घर मुंबईच्या जुहू भागात आहे. जॅकलिन गेली अनेक वर्षे मुंबईच्या वांद्रे भागात भाड्याच्या घरात राहत होती. जॅकलिन आता ज्या घरात राहतेय, तिथेच 2018 मध्ये प्रियाकांचे निक जोनाससोबत लग्न झाले होते. जॅकलिनचे हे घर कर्मयोग नावाच्या इमारतीत आहे. प्रियांकाने अलीकडेच हे घर विकले होते.

प्रियांकाने ज्यांना विकले त्यांच्याकडून जॅकलिनने भाड्याने घेतले

पिंकविलाच्या वृत्तानुसार, जॅकलिन नुकतीच या घरात शिफ्ट झाली आहे. घरामध्ये मोठा लिव्हिंग एरिया आणि आउटडोअर बालकनी आहे. जॅकलिन या घरात येण्यापूर्वी वांद्रे येथे राहत होती. प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी काही दिवसांपूर्वीच हे घर विकले असून आता त्या आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ यारी रोड अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले आहेत. आता जॅकलिन या घरात भाड्याने राहात आहे.

जॅकलिनचे आगामी प्रोजेक्ट्स

जॅकलिन फर्नांडिसच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे म्हणजे, ती यावर्षी खूप बिझी आहे. अलीकडेच तिने सैफ अली खानसोबत 'भूत पुलिस' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहेत. आता लवकरच ती रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ती अखेरची मिस सीरियल किलर या चित्रपटात दिसली होती. शिरीष कुंदर दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...