आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या सुनावणीसाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज दिल्लीतील पतियाळा कोर्टात हजर झाली. विशेष म्हणजे आज या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुकेश चंद्रशेखर यालाही कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी जॅकलिन आणि सुकेश हे सुनावणीदरम्यान समोरासमोर आले. यावेळी जॅकलिनसोबत तिचे वकील प्रशांत पाटील आणि शक्ती पांडेही हजर होते. सुनावणीदरम्यान जॅकलिन फर्नांडिस आरोपीच्या पिंजऱ्यात पुढे उभी होती, तर सुकेश तिच्यामागे उभा होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 22 डिसेंबर रोजी होणार आहे.
सुकेशची पत्नी लीनाच्या कार जप्त करण्याचे आदेश
कोर्टाने ईडीला 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रखरणी सुकेशची पत्नी लीना मारिया पॉलच्या 26 कार जप्त करण्यासाठी परवानगी दिली आहे. तर जॅकलिनने 23 डिसेंबरपासून बहरीनला जाण्याची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला आहे. कोर्टाने ईडीला उत्तर देण्यासाठी 22 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.
काय झाले सुनावणीदरम्यान?
तिहार जेलमध्ये सुकेशकडून अनेक मोबाईल मिळाल्याचे ईडीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. सुकेश हा या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे वकील म्हणाले. 200 कोटींची फसवणूक झालेल्या पीडितेला पहिला कॉल लँडलाइनवरुन आला होता. जो सुकेशने पीडितेला केला होता. या प्रकरणात सुकेशने आदिती सिंहकडून 57 कोटी घेतल्याचे मान्य केले होते. मात्र पोलिस तपासात ही रक्कम 80 कोटी असल्याचे समोर आले होते.
सुकेशने या रकमेतून तुरूंग प्राधिकरणाला भेटवस्तू पाठवल्याची माहिती दिली होती, असे ईडीच्या वतीने सांगण्यात आले. बी. मोहनराजसाठी एक कार खरेदी केली होती, ज्याच्याशी सुकेश तुरुंगात असतानाही संपर्कात होता. तिहारचे डीजी संदीप गोयल यांना 5 कोटी तर बी मोहनराज यांना रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीसाठी 9 कोटी देण्यात आले होते. सुकेशने दीपक रामनानी यांच्यामार्फत आदिती सिंहकडून 57 कोटी रुपये घेतले होते. याशिवाय सुकेशने शिवेंद्र मोहन सिंह आणि मालविंदर यांचीही भेट घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. ईडीच्या म्हणण्यानुसार, सुकेशने स्वतः 57 कोटी रुपये जमा केल्याची कबुली दिली आहे.
सुकेशचा नवा दावा - आपला 60 कोटी दिले
सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिनच्या वकिलांच्या मागणीवरुन न्यायालयाने ईडीला पुरावे असलेल्या आरोपांच्या छोट्या नोट्स देण्यास सांगितले आहे. यासोबतच न्यायालयाने सर्व पक्षकारांना त्यांचे लेखी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी पिंकी इराणी हिच्या मोबाईलचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर न केल्याची बाब न्यायालयासमोर मांडण्यात आली. पुढील सुनावणीपूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान सुकेशने आम आदमी पार्टीला 60 कोटी दिल्याचा दावा केला आहे.
सुकेशने आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप केले. सुकेशचे वकील अनंत मलिक यांनी सांगितले की, सुकेश चंद्रशेखर याने कोर्टाला सांगितले की, त्याने आम आदमी पार्टीला 60 कोटी रुपये दिले आहेत. त्याच्या या खळबळजनक दावा एका उच्चस्तरीय समितीने नोंदवून घेतला आहे. तसेच हे आरोप गंभीर असून याप्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी शिफारसही यावेळी या समितीने केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.