आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा93 व्या अॅकडमी अवार्डच्या स्पर्धेसाठी भारताकडून पाठवण्यात आलेला मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू' स्पर्धेतून बाद झाला आहे. अॅकडमीकडून स्पर्धेत कायम राहिलेल्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात करीश्मा देव दुबेचा लाइव्ह एक्श्न लघुपट 'बिट्टू'ने आपले स्थान कायम ठेवले आहे. फायनल नॉमिनेशनची घोषणा 15 मार्चला होत असून अवार्ड समारंभ 25 एप्रिल रोजी होणार आहे. स्पर्धेसाठी 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2020 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटामधून निवड होणार होती. ऑस्करमध्ये 93 देशातील चित्रपटांमध्ये स्पर्धा आहे.
'बिट्टू' अजूननही स्पर्धेत कायम
करीश्मा देव दुबेच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या 'बिट्टू'मध्ये दोन शाळकरी मुलांच्या मैत्रीची गोष्ट आहे. हा चित्रपट जगातील 18 देशामधील फिल्म फेस्टीव्हलमध्ये दाखवण्यात आला आहे. दरम्यान, तामिळ दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरीची मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू' भारताकडून पाठवण्यात आलेला अधिकृत चित्रपट होता. पण, या चित्रपटाला आपले स्थान टिकवता आले नाही.
इतर चित्रपटांचे काय झाले ?
ऑस्करच्या स्पर्धेत भारताकडून 'नटखट', 'शेमलेस', 'सुरासाई पोट्टू'देखील सहभागी होते. परंतू, अद्याप अॅकडमी अवॉर्डच्या नॉमिनीजची यादी तयार न झाल्यामुळे 'सूरासाई पोट्टू' स्क्रीनिंग रुपामध्ये उपलब्ध आहे. हा चित्रपट जनरल कॅटगरी, जसे बेस्ट अॅक्टर, अॅक्ट्रेस, डायरेक्टर, रायटर आणि ओरिजनल स्कोर कॅटगिरीमध्ये आपले स्थान टिकवून आहे.
परदेशी चित्रपटांच्या कॅटेगरीमध्ये अद्याप मिळाला नाही ऑस्कर
2019 मध्ये जोया अख्तरच्या 'गली बॉय'ला 2020 च्या 92 व्या अॅकडमी अवार्डसाठी भारताकडून पाठवण्यात आले होते. याअगोदर रिमा दासच्या 'विलेज रॉकस्टार्स', अमित मसुसकरची 'न्यूटन', वेट्री मारनच्या 'विसारानई' आणि चैतन्य ताम्हणेच्या 'कोर्ट'ला भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आले आहे. पण, अद्याप भारताला या कॅटेगरीमध्ये एकदाही ऑस्कर पुरस्कार जिंकता आला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.