आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OTT मुव्ही रिव्ह्यू:यशस्वी स्त्री आणि एका आईचे द्वंद दाखवतो 'जलसा', विद्या बालन-शेफाली शाह जोडीने पडद्यावर केली कमाल

शशांक मणी पाण्डेय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा कसा आहे विद्या बालन-शेफाली शाहचा 'जलसा'...

कथा: विद्या बालनने माया मेनन या यशस्वी पत्रकाराची भूमिका साकारली आहे. शेफाली शाहने मायाची मोलकरीण रुखसाना मोहम्मदची भूमिका वठवली आहे. माया ही अशी एक पत्रकार आहे जिला बघायला आणि ऐकायला लोकांना आवडते. एके रात्री माया ऑफिसमधून घरी येत असताना तिची भरधाव कार एका तरुणीला धडक मारते. हे पाहून ती खूप घाबरते आणि अपघातात जखमी झालेल्या मुलीला रस्त्यावर सोडून पळून जाते. कथा पुढे सरकते आणि कळते की मायाच्या कारने ज्या तरुणीला धडक मारली होती, तिचे नाव आलिया असून ती रुखसानाची मुलगी आहे.

यानंतर माया स्वतःला वाचवण्यासाठी काय करते आणि या परिस्थितीत चित्रपटातील बाकीची पात्रे कथेशी कशी जोडली जातात, हीच चित्रपटाच्या पुढची कथा आहे. रुखसानाला तिच्या मुलीचा अपराधी कोण आहे हे समजतं का का? मायाला शिक्षा मिळते की नाही...? रुखसाना सूड घेते की नाही..? हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

अभिनय आणि दिग्दर्शन: विद्या बालन आणि शेफाली शाह, दोघीही आपापल्या पात्रांमध्ये उत्कृष्ट आहेत. जलसामध्ये एका पत्रकाराच्या भूमिकेत विद्या शोभून दिसते. यासोबतच तिच्या चेहऱ्यावरचा गिल्टही वेळोवेळी दिसत राहतो. याउलट शेफालीने मोलकरणीची व्यक्तिरेखेसोबत आईची भावना उत्तम पद्धतीने रेखाटली आहे.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर विद्या आणि शेफालीच्या अभिनयासाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. मात्र चित्रपटातील मानव कौल हे पात्र का आहे हे समजले नाही? अभिनयानंतर सुरेश त्रिवेणी यांच्या दिग्दर्शनाबद्दल बोलायचे झाले तर चित्रपट अनेक ठिकाणी तुटक वाटतो. चित्रपटातील प्रत्येक कथेसोबत दुसरी कथा जोडलेली आहे. रायटिंग टीमने प्रत्येक गोष्ट अतिशय सुरेखपणे जोडली आहे.

निष्कर्ष: 126 मिनिटांच्या या चित्रपटाचा शेवट उत्कृष्ट आहे. चित्रपटाच्या शेवटी एक सुंदर संदेशही आहे. आपले जीवन आपल्याला अनेक पर्याय देते, परंतु आपण काय निवडतो ते आपल्यावर अवलंबून असते, असा संदेश हा चित्रपट आपल्याला देतो. सरतेशेवटी 'जलसा'ही या टप्प्यावर आपली साथ सोडतो. जर तुम्हाला या वीकेंडला चांगला अभिनय आणि कथा असलेला चित्रपट पाहायचा असेल, तर तुम्ही Amazon Prime Video वर 'जलसा' पाहू शकता.

बातम्या आणखी आहेत...