आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना व्हायरसचा फिल्म इंडस्ट्रीवर परिणाम होताना दिसतोय. हॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मालिकांपैकी एक असलेल्या जेम्स बाँडच्या 'नो टाइम टू डाय' या चित्रपटावरही याचा परिणाम झालेला दिसतोय. सलग चौथ्यांदा या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. आता तब्बल सहा महिने या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
कोरोनामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जेम्स बाँड’ चित्रपटाच्या फ्रँचायझीच्या अधिकृत माहितीनुसार, हा चित्रपट आता 2 एप्रिल रोजी नव्हे, तर सहा महिन्यांनंतर म्हणजे 8 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याआधीही निर्मात्यांची रिलीड डेट बर्याच वेळा बदलली आहे. ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या होणार असल्याचीही चर्चा रंगली. परंतु निर्मात्यांनी स्पष्ट केले की, हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच रिलीज करण्यात येईल.
NO TIME TO DIE 8 October 2021 pic.twitter.com/HZlNG5kz8t
— James Bond (@007) January 22, 2021
चार वेळा बदलली प्रदर्शनाची तारीख
जेम्स बाँड सीरिजचा हा 25 वा चित्रपट यापूर्वी एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र मार्च महिन्यात संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे थिएटर बंद होते. त्यानंतर निर्मात्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. ब्रिटनमध्ये 12 नोव्हेंबर 2020 ही प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली होती. तर भारतासह संपूर्ण जगात हा चित्रपट 25 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे याचे प्रदर्शन एप्रिल 2021 पर्यंत लांबणीवर टाकण्यात आले. आता पुन्हा एकदा या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सहा महिने पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 8 ऑक्टोबर 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
14 वर्षांपासून एजंट 007ची भूमिका साकारत आहे डेनियल
या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा 51 वर्षीय डॅनियल क्रेग सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारा बाँड अभिनेता ठरला आहे. 2005 पासून त्याने 4 जेम्स बाँड चित्रपट केले आहेत. आगामी ‘नो टाइम टू डाई’ हा त्याचा पाचवा बाँडपट आहे. डॅनियल क्रेगचा 'नो टाइम टू डाई' हा बाँडपटातील त्याचा शेवटचा चित्रपट असेल. यापूर्वी डॅनियलने जेम्स बॉण्ड फ्रेंचायझीच्या 'क्वांटम ऑफ सोलेस', 'स्कायफॉल', 'कॅसिनो रॉयल' आणि 'स्पेक्टर 007' मध्ये काम केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.