आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या आणि मोठ्या अशा दोन्ही पडद्यावरील कलाकारांना कोरोना होण्याचे सत्र सुरुच आहे. दोन आठवड्यांपुर्वी टिव्ही सिरीयल 'बड़े अच्छे लगते है' तील मुख्य अॅक्टर नकुल मेहता याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता नकुलची पत्नी जानकी हिला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जानकीने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. जानकीने म्हटले आहे की, मला देखील कोरोनाची लागण झाली, आमचा 11 महिन्यांचा मुलगा सूफी याला देखील कोरोनाचे संक्रमण झाले आहे.
पोस्टच्या माध्यमातून जानकीने म्हटले आहे की, नकुलला कोरोनाची लागण झाल्यानंतर मी माझी आणि माझ्या लहान मुलाची देखील कोरोना चाचणी करुन घेतली. त्यात आम्हा दोघांनाही कोरोनाची लागणा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढे जानकीने म्हटले आहे की, मुलाची तब्येत बिघडल्यामुळे खुप कठीण प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला होता. मुलाला मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले..
कोरोना झाल्यानंतरही जानकीने मुलाची घेतली काळजी
जानकीने आपला मुलगा सूफीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यात तिने म्हटले आहे की, "आपल्यापैकी बऱ्याच जणांना कल्पना असेल की माझे पत्नी यांनी दोन आठवड्यांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही काळाने मला देखील कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली. मी आजारी पडण्याअगोदर एक दिवसांपुर्वीच सूफीला ताप आला होता. औषधे आणि पाण्याच्या पट्टया ठेऊनही कोणतेच फायदे झाले नाही. त्याच रात्री मी त्याला अर्ध्या रात्री दवाखान्यात घेऊन गेले. त्यावेळी त्याला 104.2 ताप होता. त्यानंतर माझे अडचणीचे दिवस सुरू झाले. माझे अनेक दिवस मुलासोबत कोरोना आयसीयू कक्षातच गेले. माझ्या लहान फाइटरने खुप काही सहन केले." असे जानकीने म्हटले आहे.
दरम्यान, नकुलला 23 डिसेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्याने आपली कोरोना चाचणी केली असता, त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.