आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी यांचा वाढदिवस:आईच्या आठवणीत जान्हवी भावूक, म्हणाली- 'मला तुझी खूप आठवण येते.. प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी आहे आणि कायमच राहील...'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज श्रीदेवी यांचा वाढदिवस आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरने तिची दिवंगत आई श्रीदेवी यांच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर करत भावनिक नोट लिहिली आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. मला तुझी खूप आठवण येते.. प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी आहे... आणि कायमच राहील... मी तुझ्यावर प्रेम करते,' अशा शब्दांत जान्हवीने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. यासह तिने एक हृदयाचा इमोजी देखील जोडला आहे. 2018 श्रीदेवी दुबई येथे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्या होत्या. 24 फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता.

यापूर्वी जान्हवीने श्रीदेवी यांच्या हस्ताक्षरातील एक नोट केली होती शेअर

श्रीदेवी यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त जान्हवीने त्यांच्या हस्ताक्षरातील एक नोट शेअर केली होती. ती नोट श्रीदेवी यांनी जान्हवीसाठी लिहिली होती. यात त्यांनी लिहिले होते, 'आय लव्ह यू... तू जगातली सर्वात बेस्ट मुलगी आहेस.' श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा देत जान्हवीने ही नोट तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. या फोटोच्या कॅप्शनमध्ये जान्हवीने 'तुझी खूप येते.' असे लिहिले होते.

मी डॉक्टर व्हावे, अशी होती आईची इच्छा

जान्हवीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. तिने सांगितले होते, 'जेव्हा मी आईकडे अभिनेत्री व्हायची इच्छा व्यक्त केली होती, त्यावेळी आमच्यात बरेच संभाषण झाले होते. आई खरं तर यासाठी तयार नव्हती. पण माझी अभिनयात रुची निर्माण झाल्याचे तिच्या लक्षात आले होते. मला डॉक्टर करायची तिची इच्छा होती. पण आज मी आईला सॉरी म्हणू इच्छिते, कारण त्यावेळी माझ्यात डॉक्टर बननण्याचा समजूतदारपण नव्हता.'

जान्हवीच्या निर्णयामुळे टेन्शनमध्ये आल्या होत्या श्रीदेवी
जान्हवी पुढे म्हणाली होती, 'मी अभिनय क्षेत्राची निवड केल्याचा निर्णय घेतल्याने आई टेन्शनमध्ये होती. पण वडिलांनी तिला मेंटली प्रिपेअर केले. माझ्या वडिलांचा माझ्या करिअर निवडीसाठी कायम पाठिंबा राहिला आहे. त्यांच्या सांगण्यावरुनच आईने मला या क्षेत्रात येण्याची परवानगी दिली होती.'

'दोस्ताना 2' मध्ये दिसणार आहे जान्हवी

'धडक'नंतर जान्हवी 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' मध्ये दिसली होती आणि या वर्षाच्या सुरुवातीला तिचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'रुही' प्रदर्शित झाला. मार्चमध्ये तिने 'गुड लक जेरी'चे चित्रीकरण पूर्ण केले. याशिवाय ती 'दोस्ताना 2'चे चित्रीकरण सुरु करणार होती. मात्र चित्रपटातील कार्तिक आर्यनच्या एक्झिटनंतर निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा बनवण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणाला विलंब झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...