आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'धडक'च्या रिलीजवेळी ओव्हर कॉन्फिडंट होती जान्हवी कपूर:म्हणाली - मला वाटले होते लोक माझा पहिला चित्रपट पाहायला येतील

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जान्हवीने 'धडक'मधून केली होती करिअरची सुरुवात

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अलीकडेच एका मुलाखतीत करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बॉक्स ऑफिस कमाईबाबत किती दबाव होता, याबाबत व्यक्त झाली आहे. सोबतच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गुड लक जेरी' चित्रपटाबाबत जास्त टेंशन नव्हते, कारण तो ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे, असेही म्हणाली आहे.

OTT रिलीज दरम्यान नंबरचा जास्त ताण नसतो
जेव्हा जान्हवीला विचारण्यात आले की, चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी तिला कसे वाटले होते, तेव्हा तिने उत्तर दिले, "जेव्हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतो, तेव्हा एक वेगळी भावना असते, कारण जेव्हा तुम्ही रिलीजपूर्वी चित्रपट पाहता तेव्हा एक मीडिया प्रिव्ह्यू असते, तेव्हा त्यांच्या रिएक्शनवरुन कळलं की प्रेक्षक तुमच्या चित्रपटांना कसा प्रतिसाद देणार आहेत. त्याच वेळी, ओटीटी रिलीजवर संख्यांचा दबाव तितकासा नसतो."

त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यावर तुम्ही थोडे कंफर्टेबल होता. या चित्रपटाच्या प्रिव्ह्यू दरम्यान मी ऐकले होते की लोक मला आणि चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे त्या रात्री मला चांगली झोप लागली. 5 कोटी, 3 कोटी किंवा 2 कोटी कमावतील याची मला चिंता नव्हती.

'धडक'च्या रिलीजच्या वेळी मी ओव्हर कॉन्फिडंट होती
जान्हवी पुढे म्हणते, "धडकच्या वेळी मला या सगळ्या गोष्टींची फारशी माहिती नव्हती. मला वाटतं, त्या वेळी माझ्यात एक प्रकारचा अतिआत्मविश्वास होता. लोक माझा पहिला चित्रपट पाहायला येतील, असा ओव्हर कॉन्फिडन्स मला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल मला खात्री होती."

जान्हवीने 'धडक'मधून केली होती करिअरची सुरुवात

जान्हवीने 2018 मध्ये 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासह ईशान खट्टर मुख्य भूमिकेत होता. अलीकडेच जान्हवीने नितेश तिवारी दिग्दर्शित 'बवाल' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात ती वरुण धवनसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'मिस्टर अँड मिसेस माही' सारखे चित्रपट आहेत. ती शेवटची 'गुड लक जेरी'मध्ये दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...