आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या स्मरणार्थ:जान्हवी कपूरने हातावर काढून घेतला यूनिक टॅटू, गोंदवून घेतले आईने लिहिलेले शब्द - आय लव्ह यू माय लब्बू

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निधनाच्या काही दिवसांपूर्वी श्रीदेवी यांनी जान्हवीसाठी एक चिठ्ठी लिहिली होती.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूरने आता बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. काही दिवसांपूर्वीच जान्हवीने पर्वतांवर घालवलेले काही खास क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून शेअर केले होते. आता जान्हवीने शेअर केलेल्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. या व्हिडिओत जान्हवीने तिच्या हातावर एक यूनिक टॅटू काढून घेतलेला दिसतोय. श्रीदेवी यांनी लिहिलेल्या काही शब्दांचा टॅटू जान्हवीने हातावर गोंदवून घेतला आहे.

श्रीदेवी यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. निधनाच्या काही दिवसांपूर्वी श्रीदेवी यांनी जान्हवीसाठी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत श्रीदेवी यांनी लिहिले होते, 'आय लव्ह यू माय लब्बू. तू या जगातली सगळ्यात चांगली मुलगी आहेत.' श्रीदेवी जान्हवीला लाडाने लब्बू म्हणून हाक मारत आणि आईने लिहिलेले हे शब्द आता जान्हवीने तिच्या हातावर गोंदवून घेतले आहेत. हातावर गोंदवलेल्या टॅटूचा फोटोदेखील जान्हवीने शेअर केला आहे.

व्हिडिओत जान्हवी टॅटू काढताना दिसतेय. हातावर दुखत असल्याने ती सतत गोविंदा, गोविंदा म्हणत आहे. आईच्या आठवणीत जान्हवीने काढलेला हा टॅटू नेटकऱ्यांना पसंत पडला आहे.

जान्हवीला डॉक्टर बनवू इच्छित होत्या श्रीदेवी

2018 मध्ये वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला होता. त्यांची थोरली मुलगी जान्हवीचा डेब्यू चित्रपट 'धडक'च्या रिलीज आधीच त्यांचे निधन झाले होते. हा चित्रपट जुलै 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच्या पाच महिन्यांपूर्वीच म्हणजे 24 फेब्रुवारीला दुबईतील एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडाल्याने श्रीदेवी यांचे निधन झाले होते. तेथे त्या कुटुंबातील एका लग्नात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या.

श्रीदेवी यांच्या निधनाच्या काही महिन्यांनी जान्हवीने 2018 मध्ये धडक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. जान्हवीने त्यावेळी एका मुलाखतीत सांगितले होते की, तिची आई तिला डॉक्टर बनवू इच्छित होती. जान्हवीने या मुलाखतीत सांगितले होते, 'जेव्हा मी आईकडे अभिनेत्री व्हायची इच्छा व्यक्त केली होती, त्यावेळी आमच्यात बरेच संभाषण झाले होते. आई खरं तर यासाठी तयार नव्हती. पण माझी अभिनयात रुची निर्माण झाल्याचे तिच्या लक्षात आले होते. मला डॉक्टर करायची तिची इच्छा होती. पण आज मी आईला सॉरी म्हणू इच्छिते, कारण त्यावेळी माझ्यात डॉक्टर बननण्याचा समजूतदारपण नव्हता.'

जान्हवी पुढे म्हणाली होती, 'मी अभिनय क्षेत्राची निवड केल्याचा निर्णय घेतल्याने आई टेन्शनमध्ये होती. पण वडिलांनी तिला मेंटली प्रिपेअर केले. माझ्या वडिलांचा माझ्या करिअर निवडीसाठी कायम पाठिंबा राहिला आहे. त्यांच्या सांगण्यावरुनच आईने मला या क्षेत्रात येण्याची परवानगी दिली होती.'

जान्हवीने सांगितले होते, "मी आणि खुशीने आयुष्य आरामात जगावे, अशी आईची इच्छा होती. तिचे म्हणणे होते, तिच्या मुलींनी त्यांचे आयुष्य ऐशोआरामात जगावे, यासाठी तिने खूप संघर्ष केला होता, तो संघर्ष कधीही तिच्या मुलींच्या वाट्याला येऊ नये, यासाठी ती प्रयत्न करत होती." पण जान्हवी म्हणाली, की मी समाधानी व्यक्ती नाही. आईवडिलांच्या पैशांवर संपूर्ण आयुष्य मला जगायचे नाही.'

बातम्या आणखी आहेत...