आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रुही'चे स्क्रिनिंग:जान्हवी कपूरने आपल्या असिस्टंटच्या कुटुंबाला दाखवला चित्रपट, नेटक-यांनी केला कौतुकाचा वर्षाव, म्हणाले - श्रीदेवी यांनी खूप चांगले संस्कार दिले आहेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'रुही' 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे

जान्हवी कपूर स्टारर आगामी ‘रुही’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग सोमवारी रात्री पार पडले. यावेळी जान्हवीने तिच्या असिस्टंटसह त्याच्या कुटुंबियांनाही आमंत्रित केले होते. स्क्रीनिंगचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात जान्हवी आपल्या असिस्टंटच्या बाळासोबत खेळताना आणि त्याच्या कुटूंबियांसह मीडियाला पोज देताना दिसतेय. जान्हवीचे व्हिडिओ आणि फोटो पाहून नेटक-यांनी तिचे कौतुक केले आहे.

सोशल मीडिया यूजर्सनी केला जान्हवीवर कौतुकाचा वर्षाव
एका नेटक-याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, "ती सर्वात नम्र स्टार किड आहे. तिने बाळाचे लाड केले. आणि किती नम्रतेने ती बोलत आहे. श्रीदेवी यांनी मुलीला चांगले संस्कार दिले आहेत.'

आणखी एका नेटक-याने लिहिले, "ती खूप लाघवी आहे. माझा तिच्याविषयी गैरसमज झाला होता. जान्हवी आता मी तुझी फॅन झाले आहे." एका नेटक-याने लिहिले, "ही मुलगी अतिशय नम्र आणि जमीनीशी जुळली आहे." तर एक नेटकरी म्हणतो, "ती महान सुपरस्टार श्रीदेवीइतकीच सुंदर आहे."

'रुही' 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे

हार्दिक मेहता दिग्दर्शित ‘रुही’ हा चित्रपट गुरुवारी (11 मार्च) चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जान्हवीसह या चित्रपटात राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. दिनेश विजान निर्मित हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. त्यांनीच 2018 मध्ये आलेल्या श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर सुपरहिट 'स्त्री' या चित्रपटाची निर्मिती केली होती.

बातम्या आणखी आहेत...