आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभ बच्चन यांची शेजारी बनली जान्हवी कपूर:जान्हवीने मुंबईत तब्बल 39 कोटींना विकत घेतले नवीन घर, तीन मजल्यांवर आहे हा नवा आशियाना

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी जान्हवीने हा करार केला आहे.

बोनी कपूर आणि दिवंगत श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिने अलीकडेच मुंबईत नवीन घर खरेदी केले आहे. वृत्तानुसार, तिच्या नवीन घराची किंमत तब्बल 39 कोटी रुपये इतकी आहे. जान्हवीचे हे नवीन घर जुहू येथील इमारतीतील तीन मजल्यांवर पसरलेले आहे. हे नवीन घर खरेदी केल्यानंतर जान्हवी आता अमिताभ बच्चन, अनिल कपूर, अजय देवगन आणि एकता कपूर यांची शेजार झाली आहे.

हे घर 4,144 स्क्वेअर फूटमध्ये आहे

जीक्यू इंडियाच्या वृत्तानुसार, 4,144 स्क्वेअर फूट जागेतील जान्हवीचे हे घर इमारतीच्या 14, 15 आणि 16 व्या मजल्यावर आहे. गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी जान्हवीने हा करार केला आहे. तसेच स्टँप ड्युटीसाठी तिने 78 लाख रुपये भरले आहेत. जान्हवी सध्या वडील बोनी कपूर आणि धाकटी बहीण खुशीसमवेत लोखंडवाला येथे राहत आहे.

2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण
जान्हवी कपूरने शशांक खेतान दिग्दर्शित ‘धडक’ या चित्रपटाद्वारे ईशान खट्टरसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या सैराट या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. यानंतर ती नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'घोस्ट स्टोरीज' आणि 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' मध्ये झळकली आहे.

तिच्या आगामी चित्रपटांमध्ये 'रुही अफजाना' आणि 'दोस्ताना 2' यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, ती लवकरच नयनतारा स्टारर ‘कोलामावू कोकिला’ च्या तामिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. पंजाबमध्ये लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...