आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊननंतर बॉलिवूडची सर्वात मोठी ओपनिंग:'रुही'ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी जमवला 3.06 कोटींचा गल्ला

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोटींचा नफा आधीच कमवला चित्रपटाने

जान्हवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्मा अभिनीत ‘रूही’ या चित्रपटाने सध्याच्या वातावरण आणि समीक्षकांच्या टीकेच्या दरम्यान बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. हार्दिक मेहता दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.06 कोटींची कमाई केली. लॉकडाऊननंतर रिलीज झालेल्या बॉलिवूडमधील आत्तापर्यंतच्या चित्रपटांपैकी हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करणारा ठरला आहे. शनिवार व रविवारपर्यंत तो बॉक्स ऑफिसवर 10 कोटींची कमाई करेल, अशी आशा ट्रेड पंडित आणि चित्रपटगृह मालकांना आहे. हा चित्रपट देशभरातील 2200 हून अधिक पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.

कोटींचा नफा आधीच कमवला चित्रपटाने

विशेष म्हणजे, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्याआधीच याचे डिजिटल राइटस 45 कोटींमध्ये विकण्यात आले होते. याशिवाय सॅटेलाइट राइट्स 25 आणि संगीत अधिकार जवळजवळ 20 कोटीमध्ये विकले होते. चित्रपटाचा एकूण निर्मिती खर्च 30 कोटी रुपये आहे. त्यामुळे चित्रपटाला 60 कोटींचा फायदा झाला आहे.

लॉकडाऊननंतर आतापर्यंत फक्त दोन हॉलिवूड चित्रपट 1 कोटींच्या वर गेले

‘रूही’ च्या आधी बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत ‘टेनेंट’ आणि ‘वंडर वूमन 1984’ या दोन इंग्रजी चित्रपटांनी फक्त 1 कोटींचा आकडा पार केला आहे. दोन्ही चित्रपटांनी 1.21 रुपये कमवले आहेत. पहिल्या दिवशी अनुक्रमे 1.21 कोटी आणि 1.45 कोटी रुपयाची कमाई केली होती. या वेळी 'शकीला', 'रामप्रसाद की तेरहवीं', 'मॅडम चीफ मिनिस्टर', 'ट्यूस्डेज अँड फ्रायडेज', 'मेरा फौजी कॉलिंग' आणि 'टाइम टू डान्स' रिलीज झाले होते. पण यांची कमाई फारच कमी होती.

पीव्हीआरमधून 90 लाखांची कमाई
पीव्हीआर चित्रपटगृहाचे सीईओ कमल ज्ञानचंदानी म्हणाले, “फक्त पीव्हीआरच्या सिनेमाविषयी बोलायचे झाले तर “रूही’ने बॉक्स ऑफिसवर 93 लाखांची कमाई केली. त्यामुळे आता लोक चित्रपटगृहात येत आहेत, असे दिसते.

इतर चित्रपटांपेक्षा जास्त प्रेक्षक आले
दिल्ली येथील डिलाइट थिएटरचे चीफ आरके मेहरोत्राने सांगितले, “ओपनिंग डेला मिड रेंजच्या चित्रपटगृहाचे पाच शो मिळून पाहिले तर 730 ते 800 लोक येथे आले होते. हा आकडा मोठा आहे. कारण यापूर्वी 'मास्टर’, 'मॅडम चीफ मिनिस्टर’, 'टेनेंट’ अाणि 'वंडर वुमन’च्या ओपनिंग डेला 600 लोक आले होते. कोरोना काळाच्या आधी सामान्य दिवसात पाच शोमध्ये 2000 ते 2500 लोक येत होते.

फक्त 200 चित्रपटगृहांत चांगली कमाई
दिल्ली-यूपीच्या तज्ज्ञांनुसार “दोन्ही राज्ये मिळून सध्या 200 चित्रपटगृह उघडली आहेत. हीच परिस्थिती इतर राज्यांची देखील आहे, कारण कुठेही चित्रपटगृहे पूर्णपणे उघडली नाहीत. तरीदेखील चित्रपटाने 3 कोटी 6 लाख रुपयाची ओपनिंग केली असेल तर ही खूपच आनंदाची बातमी आहे.

'रूही'च्या आधी आलेल्या चित्रपटाची ओपनिंग

सिनेमाओपनिंग डे कलेक्शन
मास्टर53 कोटी
सूरज पर मंगल भारी70 लाख
​​​​​​​इंदू की जवानी17 लाख
बातम्या आणखी आहेत...