आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपबीती:जान्हवीने सांगितला क्वारंटाईनचा अनुभव, म्हणाली - आता किचनमध्ये जायचे असले तरी मास्क आणि ग्लोज घालतो

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फिल्मफेयरला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने क्वारंटाईनचा अनुभव सांगितला आहे.

काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांच्या घरात काम करणा-या तीन सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब होम क्वारंटाईन झाले होते. बोनी यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरने फिल्मफेयरला दिलेल्या मुलाखतीत क्वारंटाईनचा अनुभव सांगितला आहे. 

आम्ही 5-6 दिवस घाबरलो होतो - जान्हवी

जान्हवीने मुलाखतीत सांगितले, “आम्ही घरी लॉकडाऊनचा काळ एन्जॉय करत होतो. कारण आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली होती. खरं तर कोरोनाच्या भीषणतेबाबत इतके दिवस टीव्ही आणि सोशल मीडियाद्वारे ऐकत होतो. मात्र स्वत:च्या घरातच कोरोनाग्रस्त सापडल्यामुळे आम्ही घाबरलो. कारण घराच्या गेटबाहेर देखील कोणी गेले नव्हते. तरी कोरोना विषाणू आमच्या घरात पोहोचला होता, हे आम्हाला समजायला मार्ग नव्हता.आम्ही सगळे 5 ते 6 दिवस खूप घाबरलो होतो.'

क्वारंटाईनचा वेळ वडिलांसोबत घालवला   

जान्हवीने सांगितल्यानुसार, क्वारंटाईनचा जास्तीत जास्त वेळ तिने तिच्या वडिलांसोबत घालवला. ती म्हणाली, 'या प्रकरणातून आम्हाला सावरायला दोन दिवस लागले. क्वारंटाईनच्या काळात घरातील प्रत्येक जण आपापल्या खोल्यांमध्ये कैद राहायचे. माझ्या वडिलांना रात्री झोपताना गरम पाणी पिण्याची सवय आहे. त्यामुळे हातात ग्लोज आणि तोंडावर मास्क लावून नंतरच मी त्यांच्याकडे पाणी घेऊन जायचे. आजही किचनमध्ये जाताना सावधगिरी म्हणून मी हातात ग्लोज आणि तोंडावर मास्क लावते.' वडील दिवसातून तीन ते चार वेळा गरम पाण्याची स्टीम घेत असल्याचेही जान्हवीने यावेळी सांगितले. 

आता घरातील प्रत्येक कर्मचाऱ्याला तोंडावर मास्क लावणे अनिवार्य केले आहे. आणि आता आम्ही स्वच्छतेवर अधिक लक्ष देतोय, असेही जान्हवीने या मुलाखतीत सांगितले.

19 मे रोजी झाले होते कोरोनाची लागण झाल्याचे निदान

बोनी कपूर यांच्या घरी काम करणा-या एका सदस्याला 19 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर बोनी यांच्या घरातील आणखी दोन सदस्यांना या विषाणूची लागण झाली होती. हे तिघेही बोनी यांच्याच घरी वास्तव्याला आहेत. 5 जून रोजी बोनी यांनी ट्विट करुन त्यांच्या घरातील सदस्यांनी कोरोनावर मात केल्याची घोषणा केली होती. 

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'मला हे कळवताना अतिशय आनंद होतोय की, आमचे तीन स्टाफ सदस्य ज्यांना कोविड 19 ची लागण झाली होती, ते  आता बरे झाले असून त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. माझी आणि माझ्या मुलींची टेस्ट यापूर्वीच निगेटिव्ह आली होती. आमचा 14 दिवसांचा क्वारंटाईन काळदेखील संपला आहे आणि आता आम्ही नवी सुरुवात करण्यास सज्ज आहोत', असे बोनी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...