आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:बोनी कपूर यांच्या घरी काम करणा-या तरुणाला कोरोनाची लागण, जान्हवी म्हणाली - 'याकाळात घरी राहणे हाच सर्वात चांगला उपाय आहे'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बोनी कपूर यांच्या घरी काम करणा-या 23 वर्षीय तरुणाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

बोनी कपूर यांच्या मुंबईस्थित घरी काम करणारा नोकर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. 23 वर्षीय चरण साहू नावाचा हा तरुण बोनी कपूर यांच्या घरीत वास्तव्याला असून 19 मे रोजी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बोनी यांनी आपल्या कुटुंबासमेवत स्वतःला क्वारंटाईन केले आहे.बोनी अंधेरी (मुंबई) च्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स भागात राहतात. ही बातमी समोर आल्यानंतर त्यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने इंस्टाग्रामवर एक मेसेज शेअर केला आहे.

जान्हवीने लिहिले की, 'याकाळात घरात राहणे हाच सर्वात चांगला उपाय आहे. सर्व सुरक्षित रहा.' जान्हवीच्या या मेसेजवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कार्तिक आर्यनने लिहिले की, 'योग्य वेळी कारवाई केल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. जनजागृती करणे महत्वाचे आहे'. त्याचवेळी कपूर कुटुंबीयांचे निकटवर्तीय आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी जान्हवीसाठी लिहिले, 'सुरक्षित रहा'.

जान्हवीने आपल्या मेसेजसोबतच बोनी कपूर यांची या प्रकरणाची अधिकृत घोषणाही शेअर केली. बोनी यांनी 19 मे रोजी सोशल मीडियावर लिहिले होते की, 'मी, माझी मुले आणि बाकीचे कर्मचारी ठिक आहोत आणि आम्हाला कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आम्ही आमच्या घराबाहेरही गेलो नाही.'

'आता आम्ही पुढील 14 दिवस सेल्फ-क्वारंटाईनमध्ये राहू. आम्ही बीएमसीच्या मेडिकल टीमकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करू. तसेच, महाराष्ट्र सरकार व महानगरपालिकेच्या तत्काळ प्रतिसादाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

'

'मी ही माहिती देत ​​आहे, कारण अफवा पसरायला नकोत. आम्ही सर्व सुरक्षात्मक उपाय करीत आहोत. आम्हाला आशा आहे की चरण बरा होईल आणि घरी परत येईल.'

बातम्या आणखी आहेत...