आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने 6 मार्च रोजी तिचा 26 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे जान्हवीचा कथिक बॉयफ्रेंड शिखर पहाडियाने खास फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉयफ्रेंड शिखर पहाडियाने जान्हवीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
शिखरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जान्हवीच्या खूप जवळ दिसतोय. हे कपल पाठमोरे उभे दिसत आहे. दोघांचा रोमँटिक अंदाज लक्ष वेधून घेत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि हार्ट ईमोजी असा कॅप्शन फोटोसह दिला आहे. जान्हवी आणि शिखरचा हा फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.
चाहत्यांना जान्हवीची मालदीव ट्रिप आठवली
दोघांचा हा रोमँटिक फोटो पाहून चाहत्यांना जान्हवीच्या मालदीव ट्रिपची आठवण झाली. काही काळापूर्वी जान्हवीने शेअर केलेले फोटो आणि आता शिखरने शेअर केलेल्या फोटोतील पार्श्वभूमी सारखीच असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. जान्हवी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मालदीव ट्रिपला गेली होती. या ट्रीपमध्ये शिखरही तिच्यासोबत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
जान्हवी बॉयफ्रेंड शिखरसोबत फॅमिली ट्रिपला गेली आहे
जान्हवी नुकतीच मुंबई विमानतळावर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया, वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूरसोबत स्पॉट झाली होती. हे सर्वजण मुंबई विमानतळावर एकत्र स्पॉट झाले होते.
शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे. दरम्यान, जान्हवी आणि शिखरने काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट केले होते. नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. आता पुन्हा ते एकत्र आल्याची चर्चा आहे. ‘इ-टाइम्स’ दिलेल्या वृत्तानुसार जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया पुन्हा एकदा एकमेकांना डेट करत आहेत. जान्हवीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "काही महिन्यांपूर्वीच जान्हवी आणि शिखर यांनी पुन्हा एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने त्यांनी त्यांच्या नात्याला नव्याने आणखी एक संधी देण्याचा विचार केला आहे."
साऊथ चित्रपटात जान्हवीची एन्ट्री
जान्हवीने तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिचा आगामी दाक्षिणात्य चित्रपट NTR 30 मधील जान्हवीचा फर्स्ट लूक शेअर केला. ज्यामध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. या चित्रपटाद्वारे ती साऊथ चित्रपटांमध्ये प्रवेश करणार आहे. फर्स्ट लूक शेअर करताना जान्हवीने लिहिले- 'शेवटी हे घडतंय. माझ्या आवडत्या ज्युनियर एनटीआरसोबत शूटिंग सुरू करण्यासाठी मी अजून वाट पाहू शकत नाही.'
जान्हवी कपूर साऊथ स्टार ज्युनियर एनटीआरसोबत साऊथ चित्रपटात पदार्पण करणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. अखेर ती NTR30 चा भाग असेल हे निश्चित झाले आहे.
या सेलिब्रिटींनी जान्हवी कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.