आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतीच तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. जान्हवीसोबत तिचा कथित प्रियकर शिखर पहाडिया आणि बहीण खुशी कपूर देखील दिसले.
पारंपरिक लूकमध्ये दिसले जान्हवी, शिखर आणि खुशी
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या लेहेंगा-चोलीमध्ये दिसली. तर खुशी कपूरने देखील लाल आणि हिरव्या रंगाची लेहेंगा-चोली परिधान केली होती. याशिवाय जान्हवीचा कथिक बॉयफ्रेंड शिखर पहाडिया पांढरे धोतर आणि भगव्या गमछात दिसला.
'एनटीआर 30' च्या शूटिंगमध्ये बिझी आहे जान्हवी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जान्हवीने तिचा साऊथ डेब्यू चित्रपट 'एनटीआर 30' चे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्तानेच जान्हवी सध्या दक्षिणेत आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत एनटीआर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एनटीआर आर्ट्स प्रोडक्शन कंपनीचे हरी कृष्ण के आणि युवा सुंधा आर्ट्सचे सुधाकर मिक्किलीनेनी करत आहेत. चित्रपटाला अनिरुद्ध रविचंद्रन यांचे संगीत आहे तर आर रत्नावेलू कॅमेरा दिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत.
शिखर पहाडिया कायम कपूर कुटुंबासोबत दिसतो
मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लाँच इव्हेंटला बोनी कपूर यांनीही हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शिखर पहाडिया बोनी कपूरसोबत दिसला. इतकेच नाही तर यावेळी दोघांनी एकत्र मीडियाला पोज दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.