आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे जान्हवी कपूर:जान्हवीचा वर्किंग बर्थडे, 'गुड लक जैरी'च्या सेटवर वडील बोनी आणि बहीण खुशीसोबत वाढदिवस करतेय साजरा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वतः जान्हवीने एका मुलाखतीत आपल्या बर्थडे प्लानविषयी सांगितले.

अभिनेत्री जान्हवी कपूर स्टारर 'रुही' हा चित्रपट येत्या 11 मार्च रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट अलीकडेच दिल्ली येथे प्रमोशनसाठी आली होती. जान्हवी मात्र तिच्या आगामी 'गुड लक जैरी' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी पटियाला येथे आहे. येथेच ती आपला 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे तिचे वडील बोनी कपूर आणि धाकटी बहीण खुशी तिला कंपनी देण्यासाठी पटिलायामध्ये पोहोचले आहेत.

स्वतः जान्हवीने एका मुलाखतीत आपल्या बर्थडे प्लानविषयी सांगितले. ती म्हणाली, 'मला आइस्क्रीम आणि केक आवडतो आणि म्हणूनच मी दिग्दर्शकालाही सेटवरच पार्टीची व्यवस्था करण्यास सांगितले. मी वाढदिवशी काम करत असले तरी माझ्यासोबत खुशी आणि वडीलही आहेत. यापेक्षा माझ्यासाठी मोठी भेट कोणती असेल.' चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ सेन गुप्ता करत आहेत.

तिरुपतीमध्ये लग्न करु इच्छिते जान्हवी
जान्हवीने एका मुलाखतीत तिच्या स्वप्नातील लग्नाच्या योजनेबद्दल सांगितले. तिला तिरुपतीमध्ये लग्न करायचे आहे. तिला लग्नात कांजीवरम साडी नेसायची असून केसांमध्ये मोगरा लावण्याची इच्छा आहे. यावेळी, तिचा नवरा लुंगी लूकमध्ये असावा आणि पाहुण्यांनी केळीच्या पानांवर जेवावे, असे तिला वाटते.

बातम्या आणखी आहेत...