आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री जान्हवी कपूरच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. जान्हवीच्या नवीन चित्रपटाचे नाव 'उलझ' असे आहे. स्वतः जान्हवीने या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात ती भारतीय परराष्ट्र सेवेतील (IFS) अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असेल. दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशू सारिया या चित्रपटाचे दिग्दर्शक असून जंगली पिक्चर्सने चित्रपटाच्या निर्मिती धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात जान्हवीशिवाय गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यू आणि मराठमोळे अभिनेते सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी दिसणार आहेत.
सोशल मीडियावर शेअर केला फर्स्ट लूक
या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना जान्हवीने लिहिले, 'डिप्लोमसीच्या जगात सिक्रेट्स खूप महाग असतात. या महिन्यात चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल.' जान्हवीच्या या पोस्टवर अनिल कपूर आणि मनीष मल्होत्रा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
IFS अधिकाऱ्याच्या आयुष्यातील आव्हानांवर आधारित आहे चित्रपट
चित्रपटाचे कथानक एका IFS अधिकाऱ्याच्या आयुष्याभोवती गुंफण्यात आले आहे. पण करिअरच्या सर्वात महत्त्वाच्या वळणावर जान्हवी एका कटाची बळी ठरते आणि तिच्या जीवाला धोका निर्माण होतो.
या चित्रपटाबद्दल मीडियाशी बोलताना जान्हवी म्हणाली, 'एक अभिनेत्री म्हणून मला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली. मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढणारे चित्रपट करायचे आहेत, उलझची स्क्रिप्ट अगदी तशीच आहे.' या चित्रपटाशिवाय जान्हवी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘बवाल’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. याशिवाय ती ज्युनियर एनटीआरबरोबर ‘एनटीआर 30’ हा चित्रपटही करत आहे.
माझे काम ओरिजिनल आहे याचा मला आनंद आहे - दिग्दर्शक
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशू सारिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर सारिया आणि परवेझ शेख यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. संवाद अतिका चौहान यांचे आहेत. या चित्रपटात राजेश तैलंग, मीयांग चांग, राजेंद्र गुप्ता हे कलाकारदेखील झळकणार आहेत. या चित्रपटाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिग्दर्शक सुधांशू सारिया म्हणाले की, 'जंगली पिक्चर्ससोबत ओरिजिनल चित्रपटासाठी सहकार्य करताना मला खूप आनंद होत आहे. राजेश तैलंग, मीयांग चेंग, सचिन खेडेकर या कलाकारांसह जान्हवीचा अभिनय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.