आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जान्हवी कपूरचा नवा चित्रपट:'गुड लक जेरी'मध्ये तरुण राजकारण्याच्या भूमिकेत दिसेल जान्हवी, ‘नायक’च्या अनिल कपूरशी मिळते-जुळते असेल पात्र

अमित कर्ण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 9 वर्षांपूर्वीच्या 'को' चित्रपटावर आधारित असेल जान्हवीचा चित्रपट

जान्हवी कपूरने आपल्या नवीन वर्षाच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. याचे नाव ‘गुड लक जेरी’ असे आहे. त्याची निर्मिती आनंद एल राय, महावीर जैन आणि लायका प्रॉडक्शन मिळून करणार आहेत. सूत्रानुसार, हा चित्रपट 2011 मध्ये रिलीज झालेल्या तामिळ राजकीय थरारक चित्रपट ‘को’वर आधारित आहे. या चित्रपटात कार्तिका नायरने मुख्य भूमिका साकारली होती. तर अभिनेत्याची भूमिका जीवाने साकारली होती. हिंदीत कथा उत्तरेची पार्श्वभूमी दाखवत तयार केली आहे. या चित्रपटाची शूटिंग साेमवारपासून पंजाबच्या फतेहगढ साहिबच्या बस्सी पठानांमध्ये सुरू झाली आहे.

‘नायक’च्या अनिल कपूरशी मिळते-जुळते पात्र
ट्रेड तज्ञांच्या मते, पत्रकार ते राजनेता बनण्याचे पात्र जान्हवीचे काका अनिल कपूरने 19 वर्षापूर्वी 'नायक'मध्ये साकारले हाेते. ‘गुड लक जेरी’ मध्ये जान्हवीचे जवळजवळ असेच पात्र आहे. जान्हवीच्या पात्राविषयी सेट वरुन जी माहिती समोर अाली, त्यानुसार,‘को’ नायकाचे पात्रदेखील यात जोडण्यात आले आहे. ‘को’ मध्ये कार्तिका नायर पत्रकाराच्या भूमिकेत होती. ती आपल्या बातम्यांमधून सिस्टममधील पोकळपणा समोर आणत होती. मात्र यात जान्हवीचे पात्र पत्रकार नसून राजकारणात असून सिस्टम सुधारण्याचा प्रयत्न करत असते.

लायकाचा दुसरा हिंदी प्रोजेक्ट
हा चित्रपट ‘को’ वर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक केवी आनंद हे हिंदी रिमेकचे दिग्दर्शन करणार नाहीत. त्यांच्या जागल मुंबई अॅड इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ सेन गुप्ता दिग्दर्शन करणार आहेत. तर लायका प्रॉडक्शन्सचा हा हिंदीचा दुसरा प्रोजेक्ट आहे. यापूर्वी त्यांनी रजनीकांत आणि अक्षय कुमारसोबत ‘रोबोट टू पॉइंट ओ’ बनवला होता.

बातम्या आणखी आहेत...