आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत पुन्हा एकदा जान्हवीचे सूत जुळल्याची चर्चा आहे. जान्हवी आणि शिखरने पुन्हा डेट करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी शिखर आणि जान्हवी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले. या पार्टीतील एक व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे.
खरं तर 2016 मध्ये जान्हवी आणि शिखर रिलेशनशिपमध्ये होते. मात्र आई श्रीदेवीमुळे जान्हवीने त्याच्यापासून फारकत घेत करिअरवर लक्ष केंद्रित केले होते. पण आता एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा दोघे एकत्र आले आहेत. यांच्यातील ही जवळीक नेटक-यांच्या नजरेतून सुटली नाही.
दिल्लीतील एका कार्यक्रमात दिसले दोघे एकत्र
दिल्लीतील एका कार्यक्रमात जान्हवी शिखरसोबत आली. यावेळी व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये दिसत आहे आणि त्याला मॅचिंग कलरचा ओव्हरकोट घातला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. तर शिखर जॅकेटमध्ये झळकत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही एका व्यक्तीशी बोलताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मालदिवमध्येही एकत्र घालवला वेळ
काही दिवसांपूर्वी जान्हवी मालदिवमध्ये सुटी घालवण्यासाठी गेली होती. यावेळी ती एकटी नव्हती तर शिखरही तिच्यासोबत होता, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. कारण शिखरने पोस्ट केलेला एक फोटो जान्हवीने शेअर केलेल्या फोटोशी मिळताजुळता आहे.
कोण आहे शिखर पहाडिया?
शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांचा मुलगा आहे. अर्थातच तो सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. स्मृती शिंदे यांचे लग्न संजय पहाडिया यांच्यासोबत झाले आहे. संजय पहाडिया हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत.
शिखर हा देखील एक बिझनेसमन आहे, शिवाय तो एक उत्तम पोलो प्लेयर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने भारताचे नेतृत्त्वदेखील केले आहे. रीजेंट युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून ग्लोबल फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये त्याने शिक्षण घेतले आहे. शिवाय लंडनस्थित ‘वाधवान ग्लोबल कॅपिटल लिमिटेड’मध्ये गुंतवणूक विश्लेषक म्हणून काम सुरू केले. याबरोबरच त्याने भारतातील ‘एंड्रोमेडा फायनान्शियल टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’मध्ये काम केले.
जान्हवीचे आगामी प्रोजेक्ट्स...
दुसरीकडे जान्हवीबद्दल सांगायचे तर ती अलीकडेच 'मिली' आणि 'गुड लक जेरी' या चित्रपटांमध्ये दिसली. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची कौतुकाची पावती मिळाली. 'मिली'मध्ये तिने अभिनेता सनी कौशलसोबत स्क्रिन शेअर केलेली तर 'गुड लक जेरी'मध्ये दीपक डोबरियालसह ती मुख्य भूमिकेत दिसली. सध्या जान्हवी तिच्या नव्या चित्रपटाच्या तयारीत आहे. वरुण धवनसोबत 'बवाल'मध्ये तर राजकुमार राव याच्यासोबत 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटांत जान्हवी झळकणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.