आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ओटीटी रिलीज:नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' हा चित्रपट, इमोशनल व्हिडीओ शेअर करुन निर्मात्यांनी केली घोषणा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेटफ्लिक्सवर हा चित्रपट कोणत्या दिवशी रिलीज होईल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Advertisement
Advertisement

जान्हवी कपूर लवकरच  कारगिल गर्ल गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट 24 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र  कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. आता निर्मात्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अलीकडेच चित्रपटाचा एक भावनिक व्हिडीओ नेटफ्लिक्सने शेअर केला आहे, ज्यात गुंजन सक्सेनाची खरी कहाणी आहे.  ‘प्लेन लडका उडाए या लडकी उसे पायलट ही कहते हैं- गुंजन सक्सेनाः द कारगिल गर्ल, जल्द आ रही है नेटफ्लिक्स पर’, असे स्लोगन या व्हिडीओला देण्यात आले आहे. 

चित्रपटात गुंजनची भूमिका साकारणा-या जान्हवीने चित्रपटाचे पोस्टर आणि व्हिडीओ शेअर करुन लिहिले, "हा फक्त माझ्यासाठी चित्रपट नाही तर मला स्वतःवर विश्वास ठेवण्याची शिकवण देणारा प्रवास आहे. एक असा प्रवास जो मी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.' 

शरण शर्मा दिग्दर्शित ‘गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल’ या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, त्याची आई हिरू जोहर, झी स्टुडिओ आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरसह पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट सुरुवातीला 13 मार्च आणि नंतर 24 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल. हा चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार याची माहितीही लवकरच समोर येईल.

  • कोविड - 19 चा ब-याच चित्रपटांवर झाला परिणाम

'गुंजन सक्सेना'पूर्वी 'गुलाबो सीताबो', 'शकुंतला देवी' आणि 'लक्ष्मी बॉम्ब' असे अनेक चित्रपट थिएटरऐवजी ओटीटीवर रिलीज होणार आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मनी संधींचा फायदा घेऊन चित्रपटांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या योजना आखल्या आहेत. पण मोठ्या बजेटच्या चित्रपटांसाठी चाहत्यांना अजून थांबावे लागेल.

Advertisement
0