आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीचा लूक:ऑल व्हाइट लुकमध्ये सुंदर दिसली जान्हवी, व्हिडिओ पाहून चाहत्यांनी केले कौतुक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. अलीकडेच ती मुकेश अंबानी कल्चर सेंटर (NMACC) च्या उद्घाटनाला पोहोचली होती. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी पांढर्‍या रंगाच्या लूकमध्ये दिसली होती. पर्ल ब्लाउज आणि पांढऱ्या लेहेंग्यात जान्हवी खूपच सुंदर दिसली. गळ्यात चोकर आणि लहान कानातले या लुकला खास टच देत होते. या लुकला जान्हवीने न्यूड मेकअप आणि ग्लॉसी लिप्सने कम्प्लिट केले आहे. चाहत्यांना तिची स्टाइल खूप आवडली आहे.

साउथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार
जान्हवी लवकरच ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जान्हवीने या चित्रपटातील तिचे एक पोस्टर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील शेअर केले आहे. ज्यामध्ये ती हिरव्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलायचे झाले तर, 'NTR 30' पुढील वर्षी 5 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्युनियर एनटीआरचा हा पहिला सोलो पॅन इंडिया चित्रपट आहे. जो तेलुगु तसेच तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

याशिवाय तिच्याकडे 'बवाल', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'मिस्टर अँड मिसेस माही' असे अनेक बॉलिवूड चित्रपट आहेत, ज्यामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.