आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जसलीनचा नवा पब्लिसिटी स्टंट:इंस्टाग्रामवर शेअर केले 37 वर्षे मोठे भजन गायक अनूप जलोटासोबत लग्नाचा फोटो, कॅप्शन नसल्याने कन्फ्यूज झाले सोशल मीडिया यूजर्स

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जसलीनने आपल्या फोटोसह अनूप जलोटा यांनाही टॅग केले आहे
  • दोन दिवसांपूर्वीही दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर आला होता

'बिग बॉस 12' मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेल्या जसलीन मथारूने स्वत: चा आणि भजन गायक अनूप जलोटा यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये जसलीन नवरीच्या पेहरावात दिसली आहे, तर अनूप हे नवरदेवच्या वेशात दिसले आहेत. जसलीनने हा फोटो अनुप यांना टॅग केले आहे. पण तिने फोटोला कॅप्शन दिलेले नाही. यामुळे बहुतेक सोशल मीडिया यूजर्स त्यांच्या लग्नाचा अंदाज बांधत आहेत.

सोशल मीडिया यूजर्ने केले असे कमेंट्स
जसलीन आणि अनूप यांचा फोटो पाहिल्यानंतर एका सोशल मीडिया यूजने लिहिले, 'खरंच मुलांनो मेहनत करा आणि पैसा कमवा... तेव्हाच असे फळ मिळेल'. आजच्या काळात पैसाच सर्वकाही आहे...चेहरा आणि वय कुणीही पाहत नाही. तर एका यूजरने कमेंट केली की, 'हमको नहीं मिल रहा दाना और दादाजी लोग खा रहे अनार का दाना' एका यूजरने कमेंट केली की, 'यापेक्षा तर माझ्यासोबत लग्न करायला हवे होते'

...आणि हे आहे फोटोमागचे सत्य
खरंतर जसलीन आणि अनूप जलोटाचा हा फोटो त्यांचा अपकमिंग हिंदी चित्रपट 'वो मेरी स्टूडेंट है'च्या सेटवरील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जसलीनचे वडील केस मथारु करत आहेत. दोन दिवसांपूर्वी स्वतः जसलीनने एक पोस्टर शेअर करुन चित्रपटाच्या शूटिंगची माहिती दिली होती. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'हाय फायनली काम सुरू. अनूप जलोटांसोबत माझा अपकमिंग चित्रपट 'वो मेरी स्टूडेंट है'ची शूटिंग'

'बिग बॉस 12' दरम्यान चर्चेत आली होती जसलीन
जसलीन 'बिग बॉस 12'च्या दरम्यान चर्चेत आली होती. या शोमध्ये ती 37 वर्षे मोठे अनूप जलोटासोबत गेली होती. दोघांनी दावा केला होता की, ते 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, 'बिग बॉस'च्या घराबाहेर आल्यानंतर दोघांनी रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त फेटाळले होते.

अनूप जलोटा म्हणाले होते - मी तिचे कन्यादान करेल
जवळपास 5 महिन्यांपूर्वी जसलीनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती लाल चूडा आणि सिंदूर लावून दिसली होती. यानंतर अंदाज लावण्यात येत होते की, तिने अनूप जलोसोबत लग्न केले. मात्र स्वतः अनूप जलोटांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. ते म्हणाले होते की, मी आणि तिचे वडील मित्र आहोत. ती माझ्या मुलीसारखी आहे. तिच्यासाठी मीच नवरदेव शोधत आहे.