आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धर्मनिरपेक्षतेचा सन्मान:'रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार' मिळवणारे जावेद अख्तर पहिले भारतीय व्यक्ती, म्हणाले - 'एवढ्या दूरवर माझे विचार पोहोचतात याचेच मला आश्चर्य वाटतेय'

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार’ जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांच्या स्मरणार्थ 2003 साली सुरु करण्यात आला.

गीतकार और पटकथा लेखक जावेद अख्तर यांना यंदा प्रतिष्ठेचा रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार जाहीर झाला आहे. अत्युच्च दर्जाचे कार्य आणि तर्कनिष्ठ वक्तव्यांबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. यापूर्वी अमेरिकी कॉमेडियन बिल माहेर आणि तत्त्ववेत्ते ख्रिस्तोफर हिचेन्स यांना या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. 

जावेद अख्तर ज्वलंत सामजिक प्रश्नांवर भाष्य करतात. सीएए,तबलिगी जमात, इस्लामोफोबिया यासारख्या विषयांवर त्यांनी अत्यंत तिखट शब्दात टि्वट्स केले आहेत. जगप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ आणि धर्मनिरपेक्षता व तर्कनिष्ठ विचार मांडणाऱ्या डॉकिन्स यांच्या नावे दिला जातो. जावेद हे स्वत: डॉकिन्स यांचे चाहते आहेत. 

पुरस्कार मिळाल्याची बातमी कळाल्यानंतर जावेद म्हणाले, एवढ्या दूरवर माझे विचार पोहोचतात याचेच मला आश्चर्य वाटतेय. माझ्या धर्मनिरपेक्ष विचारांशी जगातील अनेक लोक सहमत आहेत ही माझ्यादृष्टीने आनंदाची बाब आहे.

जावेद अख्तर यांच्या पत्नी  आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी या पुरस्कारासाठी त्यांचे कौतुक केले आहे. हा पुरस्कार जावेद अख्तर यांच्यासाठी एका प्रेरणास्त्रोताचं काम करेल, असे त्या म्हणाल्या आहेत.

त्यांनी ट्विट केले, “रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार मिळाल्याबद्दल जावेद अख्तर यांचे अभिनंदन. मानवतावादी मुल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार जावेद अख्तर यांना भविष्यात आणखी काम करण्यासाठी एका प्रेरणास्त्रोताचे काम करेल.''

इरफान हबीब, नंदिता दास, अनिल कपूर आणि दीया मिर्झा यांनीही ट्विट करुन जावेद अख्तर यांना या पुरस्कारासाठी शुभेच्छा दिल्या.  

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser