आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाउडस्पीकरचा विरोध:'लाउडस्पीकरवर अजान लावल्यामुळे इतरांना त्रास होतो, हे बंद करायला हवे'- जावेद अख्तर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जावेद अख्तर यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर लाउड स्पीकरवर अजान देण्यावर वाद सुरू
  • सोनू निगमनेही एप्रिल 2017 मध्ये अजानबद्दल एक ट्वीट केले होते, यूजर्सकडून झाले होते ट्रोल

लोकप्रिय गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी परत एखदा इतरांना होणाऱ्या त्रासामुळे लाउड स्पीकरवर अजान देण्यावर बंदी घालण्याबाबत वक्तव्य केले आहे. शनिवारी रात्री त्यांनी याबाबत ट्वीट केले. यानंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. एप्रिल 2017 मध्ये गायक सोनू निगमनेही याप्रकारची मागणी केली होती. तेव्हा जावेद अख्तर यांनी त्याचे समर्थन केले होते.

अख्तर यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहीले, 'भारतात 50 वर्षापर्यंत लाउडस्पीकरवरुन अजान देने हराम होते, पण नंतर हे हलाल झाले आणि इतके हलाल की, याची मर्यादाच नाही. परंतू, याचा अंत व्हायला हवा. अजानचा काहीच त्रास नाही, पण लाउडस्पीकरमुळे इतरांना त्रास होतो. मला आशा आहे की, याबाबत ते स्वतः काही करतील.'

यूजर म्हणाले- आम्ही शैतानाच्या हातात खेळत नाहीत

जावेद यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना एका मुस्लिम यूजरने लिहीले, 'तुमच्या सल्याला असहमती दर्शवतो. इस्लाम आणि या धर्माला मानणाऱ्या लोकिंबाबत अशी टीका करू नका. आम्ही दरवेळेस मोठ्या आवाजात गाणे लावत नाही, शैतानाच्या हातात आम्ही खेळत नाहीत. अजान कोणाला प्रार्थाना आणि चांगल्या आयुष्याकडे वळवण्याचा उत्तम पर्याच आहे.'

अख्तर म्हणाले, ते सर्व चूक होते का?

त्या यूजरला उत्तर देताना अख्तर म्हणाले की, 'तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की ते सर्व इस्लामिक विद्वान ज्यांनी 50 वर्षे लाउडस्पीकरला हराम घोषित केले होते, ते सर्व चूक होते. हिम्मत असेल, तर असे बोलून दाखवा. नंतर मी तुम्हाला त्या सर्व इस्लामिक विद्वानांचे नाव सांगेल.'

सोनू निगमनेही ट्वीट करत मुद्दा उचलला होता

यापूर्वी एप्रिल 2017 मध्ये गायक सोनू निगमने लाउडस्पीकरवर अजान चालवण्याचा विरोध केला होता. याबाबत त्याने अनेक ट्वीट केले होते. त्याने लिहीले होते की, 'देव सर्वांच भले करो. मी एक मुस्लिम नाही, पण मला सकाळी अजानच्या आवाजाने उठावे लागते. भारात कधीपर्यंत ही जबरदस्तीची धार्मिकता चालेल. मी मंदिरात किंवा गुरुद्वारामध्येही विजेच्या उपकरणांच्या मदतीने उठवण्याचा विरोध करतो. ही गुंडगिरी आहे.'

बातम्या आणखी आहेत...