आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाविरोधात आणखी एक खटला:जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा केला दाखल, अभिनेत्रीने धमकावल्याचा केला होता आरोप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाच्या बहिणीने आठ महिन्यांपूर्वी ट्विट केले होते की, जावेद अख्तर यांनी हृतिक रोशनची माफी मागण्यासाठी कंगनावर दबाव आणला होता.

अभिनेत्री कंगना रनोटच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये. आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. एका रिपोर्टनुसार, अख्तर यांनी कंगनाच्या एका विधानावर आक्षेप घेतला आहे. जावेद अख्तर यांनी आपल्याला घरी बोलावून हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली होती, असा दावा कंगनाने केला होता.

  • रिपोर्टमध्ये दावा - जावेद अख्तर यांनी धमकी दिली नव्हती

स्पॉटबॉयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकी दिली नव्हती. आता हे प्रकरण कोर्टात पोहोचले असून जावेद अख्तर दीर्घ लढाई लढण्यास तयार आहेत. कोर्टाबाहेर हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हटले देले आहे.

  • कंगनाची मॅनेजर आणि थोरली बहीण रंगोलीने 8 महिन्यांपूर्वी केले होते ट्विट

कंगनाची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेल हिने ट्विट करुन जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावल्याचा आरोप केला होता. तिने लिहिले होते, "जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावले आणि हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली. महेश भट्टच्या चित्रपटात सुसाइड बॉम्बरची भूमिका साकारण्यास नकार दिल्याने महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती. ते पंतप्रधानांना फॅसिस्ट म्हणतात .... चाचाजी तुम्ही दोघे काय आहात?", अशा आशयाचे ट्विट करुन रंगोलीने जावेद अख्तर आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला होता.

  • हृतिक रोशन-कंगना रनोट वाद काय होता?

2009 पासून 2013 पर्यंत कंगना हृतिकसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ब्रेकअपनंतर या दोघांमध्ये बराच वाद झाला होता. 2016 मध्ये एका कार्यक्रमात कंगनाने हृतिकचा उल्लेख सिली एक्स म्हणून केला होता. शिवाय रिलेशनशिप दरम्यान हृतिकने तिला केलेले मेल्स आपल्याकडे पुरावा म्हणून असल्याचा दावा तिने केला होता. यावरुन हृतिकने कंगनाविरोधात मुंबई गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती.

  • गेल्या महिन्यात कंगनाच्या विरोधात 3 गुन्हे दाखल करण्यात आले

ऑक्टोबरमध्ये कर्नाटकच्या तुमकुरमध्ये कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्यावर शेतक-यांचा अपमान केल्याचा आरोप होता. यानंतर मुंबईत 2 प्रकरणे नोंदली गेली. यामध्ये कंगनावर धर्माच्या आधारे द्वेष पसरवण्याचा आणि कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप होता.