आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख स्टारर 'जवान'च्या दिग्दर्शकाची गुड न्यूज:दिग्दर्शक एटली-प्रियाला लग्नाच्या 8 वर्षांनी बाळाची चाहुल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळ फिल्म इंडस्ट्रीमधील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून एटलीला ओळखले जाते. लवकरच एटली जवान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याच्या या चित्रपटात बॉलिवूडचा किंग शाहरुख खान झळकणार आहे. आता एटलीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. एटली लवकरच बाबा होणारेय. होय त्याची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया गरोदर असून दोघांनी ही गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

एटलीची पत्नी कृष्णा प्रिया हिने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. "आम्ही गरोदर आहोत हे जाहीर करताना आनंद होत आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे. विथ लव एटली आणि प्रिया," असे कॅप्शन तिने दिले आहे.

लग्नाच्या 8 वर्षानंतर या जोडप्याच्या घरी पहिल्यांदा पाळणा हलणार आहे. "आम्ही तुमच्या सर्वांचे प्रेम आणि समर्थनासाठी कृतज्ञ आहोत आणि तुम्ही आमच्या येणाऱ्या नव्या पाहुण्यावर अशाच प्रेमाचा वर्षाव करत रहावे अशी आमची इच्छा आहे," असे एटली म्हणाला आहे.

जवळजवळ आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर एटली आणि प्रिया यांनी 2014 मध्ये लग्न केले होते. अनेकदा एटलीला त्याच्या रंगावरुन ट्रोल केले जाते, पण त्याने त्याच्या कामातून तो खणखणीत नाणं असल्याचे सिद्ध केले आहे.

कोण आहे एटली?
एटली कुमार हा हिंदीत पदार्पण करणार असला तरी तो तामिळ फिल्म इंडस्ट्रीमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. तामिळनाडूमधील मदुरईमध्ये 21 सप्टेंबर 1986 रोजी जन्मलेल्या एटलीचे पूर्ण नाव अरुण कुमार आहे. एटली तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शनाबरोबरच स्क्रीनप्ले रायटींग आणि निर्माता म्हणून ओळखला जातो. 2013 मध्ये 'राजा राणी' चित्रपटामधून एटलीने तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. फॉक्स स्टार स्टुडिओ आणि ए. आर. मुर्गुदास यांची संयुक्त निर्मिती असणाऱ्या ‘राजा राणी’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. ‘राजा राणी’ चित्रपटाच्या आधी एटलीने एस शंकर यांच्या एन्थीरान (2010) आणि नानबान (2012) चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. ‘राजा राणी’च्या यशानंतर त्याने थारी (2016), मिरसाल (2017) आणि बिगील (2019) या चित्रपटाचे दिग्दर्शन निर्मिती आणि स्क्रीन प्ले रायटींग केले. दिग्दर्शनानंतर त्याने ‘ए ऑफ अ‍ॅपल प्रोडक्शन’ नावाची कंपनी स्थापन करुन निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण केले.

  • राम चरण-उपासना लवकरच होणार आईबाबा:लग्नाच्या 10 वर्षांनंतर कपलने दिली गुड न्यूज, 2023 मध्ये येणार छोटा पाहुणा!

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला लवकरच आईबाबा होणार आहेत. लग्नाच्या 10 वर्षानंतर हे दोघे आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

राम चरणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. 'आम्हाला हे सांगायला अतिशय आनंद होत आहे की, श्री हनुमान जी यांच्या आशीर्वादाने राम चरण आणि उपासना हे दोघे लवकरच त्यांच्या बाळाचे स्वागत करणार आहेत. प्रेम आणि कृतज्ञता. सुरेखा आणि चिरंजीवी कोनिडेली, शोबाना आणि अनिल कामिनेनी.', असे या पोस्टमध्ये लिहिले आहे. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...