आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीज डेट:जवान 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार, शाहरुख खान-गौरी यांनी शेअर केली चित्रपटाची नवी रिलीज डेट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानचा आगामी चित्रपट जवान या वर्षी 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान आणि चित्रपटाची निर्माती गौरी खान यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली. ऍटली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा, विजय देखील दिसणार
'जवान'मध्ये शाहरुख खानसोबत विजय सेतुपती आणि नयनताराही दिसणार आहेत. विजय चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे. यापूर्वी हा चित्रपट 2 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार होता.

विजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार
इंडिया टुडेशी बोलताना विजयने सांगितले की, तो नयनतारा आणि विघ्नेश शिवनच्या लग्नात शाहरुख खानला भेटला होता. लग्नातच त्याने शाहरुखला त्याच्यासोबत खलनायक म्हणून काम करायचे असल्याचे सांगितले होते. नयनतारा- विघ्नेशचा विवाह ९ जून २०२२ रोजी झाला होता.

चित्रपटाचा शीर्षक घोषणा व्हिडिओ जून 2022 मध्ये आला होता
याआधी जून 2022 मध्ये चित्रपटाच्या शीर्षक घोषणा व्हिडिओ रिलीज झाला होता. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचे या वर्षी तीन सिनेमे रिलीज होणार आहेत. पठाण याआधीच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडले आहेत. पठाणने जागतिक बॉक्स ऑफिसवर 1050 कोटींचा व्यवसाय केला आहे.