आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

73 वर्षांच्या झाल्या जया बच्चन:लग्नाविनाच जयासोबत सुट्टीवर जाणार होते बिग बी, वडील म्हणाले - तुला जायचे असेल तर तुला हिच्याबरोबर आधी लग्न करावे लागेल, नाहीतर...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बींना वडिलांनी दिला होता लग्नाचा सल्ला

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 73 वर्षे पूर्ण केली आहेत. 9 एप्रिल 1948 रोजी जबलपूर येथे त्यांचा जन्म झाला होता. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या जया यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर निवडक चित्रपटांमध्ये काम केले आणि आपला जास्तीत जास्त वेळ कुटुंबाला दिला. जया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या लग्नाशी संबंधिक एक रोचक किस्सा आम्ही तुम्हाला सांगत आहोत. अमिताभ-जया यांच्या लग्नाला आता 48 वर्षे लोटली आहेत. एका चॅट शोमध्ये बिग बींनी हा किस्सा शेअर केला होता.

वडिलांनी दिला होता लग्नाचा सल्ला
अमिताभ यांनी सांगितले होते, 'मी आणि जयाने जंजीर या चित्रपटात एकत्र काम केले होते जर 'जंजीर' हिट झाला तर लंडन सुट्टी एन्जॉय करायला जाऊ असे चित्रपटाच्या टीमने ठरवले होते. मी ही गोष्ट घरी बाबूजींना सांगितली.'

पुढे बिग बींनी सांगितले, 'मग माझ्या वडिलांनी विचारले की, तू कोणाबरोबर जात आहेस? मी कोणाबरोबर जात आहे हे जेव्हा मी त्यांना सांगितले, तेव्हा ते म्हणाले - तुला जायचे असेल तर तुला हिच्याबरोबर आधी लग्न करावे लागेल, नाहीतर तू जाऊ नकोस... म्हणून... मी त्या आज्ञेचं पालन केलं. जंजीर हिट ठरला आणि आम्ही लंडनला फिरायला गेलो.'

जयाचा लग्नानंतरचा शेवटचा चित्रपट होता 'सिलसिला'

लग्नानंतर जया अखेरच्या 1981 साली प्रदर्शित झालेल्या 'सिलसिला' या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटात जया, रेखा आणि अमिताभ यांचे प्रेम त्रिकोण होते, पण चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. तब्बल 17 वर्षांच्या ब्रेकनंतर जया पुन्हा मोठ्या पडद्यावर परतल्या आणि 1998 साली आलेल्या 'हजारी चौरासी की मां' मध्ये त्यांनी काम केले होते. यानंतर त्या 'फिजा', 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो', 'लागा चुनरी में डाग', 'द्रोण' या चित्रपटांमध्ये दिसल्या.

बातम्या आणखी आहेत...