आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या त्यांच्या तापट स्वभावासाठी ओळखल्या जातात. पापाराझींनी त्यांचे फोटो काढणे त्यांना मुळीच आवडत नाही. अनेकदा त्या फोटोग्राफर्सवर वैतागलेल्या दिसल्या आहेत. पण गुरुवारी मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. यावेळी जया बच्चन चक्क हसून फोटोग्राफर्सना भेटताना दिसल्या. इतके नाही तर त्यांनी यावेळी त्यांच्या रागामाचे कारणही सांगितले आहे.
गुरुवारी रात्री बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. जया बच्चनदेखील त्यांच्या आवडत्या डिझायनरच्या पार्टीला आवर्जुन हजर होत्या. त्यांची लेक श्वेता बच्चनही या पार्टीत पोहोचली होती. यावेळी कायम संताप व्यक्त करणाऱ्या जया बच्चन यांनी हसत फोटोग्रार्सना पोज दिल्या. "पाहा किती स्माइल करतेय मी" असेही त्या म्हणाल्या. त्यांचे या पार्टीतील बरेच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जया बच्चन यांनी सांगितले त्यांच्या रागामागचे कारण
यावेळी फोटोग्राफर्सशी संवाद साधताना जया बच्चन यांनी त्यांच्या रागामागील कारणही सांगितले. "जेव्हा इव्हेंट असतो आणि तुम्ही सगळे असे व्यवस्थित उभे राहून फोटो काढता, तेव्हा मी फोटो काढू देण्यास तयार असते. पण जेव्हा आमचे काहीतरी पर्सनल काम असते आणि तेव्हा तुम्ही लपून छपून फोटो काढता ते मला आवडत नाही," असे जया बच्चन यावेळी म्हणाल्या.
त्यांनी यावेळी त्यांच्या एका परिचयातील फोटोग्राफरसोबत फोटोदेखील काढून घेतले.
अलीकडेच फोटोग्राफर्सवर वैतागल्या होत्या जया बच्चन
जया बच्चन यापूर्वी अनेकदा फोटोग्राफर्सवर भडकताना दिसल्या. काही दिवसांपूर्वीच इंदूर विमानतळावर त्या दिसल्या होत्या. यावेळी त्यांचे पती आणि अभिनेते अमिताभ बच्चनदेखील त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांना विमानतळावरील कर्मचारी आणि चाहते बिग बींसोबत फोटो काढण्यासाठी आले. त्यांचे वागणे पाहून जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या चिडून 'अशा लोकांना कमावरुन काढून टाकयला हवे' असे म्हणाल्या होत्या. इतकेच नाही तर 'माझे फोटो काढू नका. तुला इंग्रजी कळत नाही का?' असेही त्या रागात म्हणाल्या होत्या. अशा वागण्याने जया बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या होत्या. पण यावेळी मात्र वेगळेच चित्र सगळ्यांना पाहायला मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.