आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणी:अमिताभ यांनी दिलेल्या साड्या आवडत नव्हत्या, पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून नेसायचे : जया

बॉलिवूड डेस्क3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘अभिमान’ या चित्रपटातील ‘तेरी बिंदिया रे’ या गाण्यात जया बच्चन यांनी अमिताभ यांनी दिलेली साडी नेसली होती

लॉकडाऊन दरम्यान सर्वजण आठवणींचा प्रवास करत आहेत. अशातच आमच्या ‘तुम्हाला माहीत आहे का?’ मध्ये आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटातील त्या कलाकाराबाबत सांगणार आहोत जे या प्रवासातील मैलाचा दगड आहेत. वयाच्या तिसऱ्या वर्षी सत्यजीत रे यांच्या  ‘महानगर’ या बंगाली चित्रपटातून सुरुवात करणाऱ्या जया बच्चन आज अापला ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. याप्रसंगी जाणून घेऊया पुण्यातील फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची गोल्ड मेडलिस्ट असलेल्या जया यांच्या व्यावसायिक, व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित किस्से... 


पुस्तक  ‘टू बी ऑर टू बी न
ॉट

अमिताभ बच्चन’चे लेखक खालिद मोहम्मद यांच्या मते जया बच्चन यांनी त्यांना सांगितले की, १९७०च्या दरम्यान त्यांचे आणि अमिताभ बच्चन यांचे आयुष्य समांतर ट्रॅकवर होते. अमिताभ बीएस्सीची पदवी पूर्ण करून कोलकाता येथे काम करत होते, तर जया आपले करिअर करण्यासाठी धडपडत होत्या. फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूटचे प्रिंसिपल जगत मुरारी यांनी चित्रपट निर्माता ऋषिकेश मुखर्जी यांच्याकडे जयासाठी शिफारस केली. कारण मुखर्जी इन्स्टिट्यूमध्ये सुमन चित्रपटासाठी अभिनेत्री शोधत होते. ऋषिकेश दा यांनी जया यांना ‘गुड्डी’ चित्रपटासाठी विचारले. जया यांनी या प्रोजेक्टबाबत माहीत आहे असे सांगत होकार दिला. चित्रपटात अभिनेता नवीन निश्चल जयासोबत भूमिका करणार होते. यादरम्यान मेहमूद यांनी निर्माते एनसी सिप्पी यांच्या माध्यमातून अमिताभ यांची ऋषी दा कडे शिफारस केली.  या पुस्तकात जयाने सांगितले की, अमिताभ त्यांना महागडी कांजीवरम साडी आिण भेटवस्तू देत होते. मजेशीर गोष्ट ही आहे की ते जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाच्या साडीला जांभळ्या रंगाची बॉर्डर असलेली साडीच आणायचे. जी जया यांना आवडाची नाही तरीदेखील अमिताभ यांना वाईट वाटू नये म्हणून जया अमिताभ यांनी दिलेली साडी नेसायच्या.

मॅगेझिनच्या कव्हरवर जया यांचे डोळे पाहून फिदा झाले होते अमिताभ 

जया यांनी अमिताभ यांना सर्वप्रथम १०७० मध्ये एफटीआयआय येथे पाहिले होते. त्यावेळी अमिताभ चित्रपटात कामासाठी संघर्ष करत होते. अमिताभ यांना अशी मुलगी पाहिजे होती जी आधुनिक आिण पारंपरिकदेखील आहे. जेव्हा त्यांनी जयाला एका मॅगेझिनच्या कव्हर पेजवर पाहिले तर त्यांच्या डोळयांवर फिदा झाले होते. यादरम्यान १९७१ मध्ये ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ चित्रपटात जया यांना एक़त्र काम करण्याची संधी मिळाली. मात्र, १९७२ मध्ये पहिल्यांदा जया आिण अमिताभ यांनी प्रकाश वर्मा यांच्या ‘बंसी बिरजू’ चित्रपटात काम केले होते. 

‘जंजीर’च्या प्रदर्शनानंतर विवाह

जया आणि अमिताभ बच्चन यांच्यात १९७२ मध्ये ‘एक नजर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जवळीकता निर्माण झाली. १९७३ मध्ये ‘जंजीर’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांनी विवाह केला अमिताभ यांनी एक मुलाखतीत सांगितले की, मी जयाला वचन दिले होते की चित्रपट यशस्वी झाला तर परदेशात फिरायला घेऊन जाईल. चित्रपट हिट झाला, पण अमिताभ यांच्या वडिलांनी लग्नाशिवाय जयासोबत फिरायला जाण्यास मनाई केली. त्यामुळे वडिलांचा आदर आणि जया यांचा सन्मान राखण्यासाठी अमिताभ यांनी ३ जून १९७३ रोजी जयासोबत विवाह केला.

१७ वर्षांनंतर पुनरागमन

“शोले’च्या चित्रीकरणादरम्यान जया पहिल्यांदा गर्भवती होत्या. मुलगी श्वेताच्या जन्मानंतर जयाने मुलांकडे लक्ष देण्यासाठी चित्रपटातून संन्यास घेतला होता. नंतर १७ वर्षांनंतर १९९८ मध्ये ‘हजार चौरासी’तून पुरागमन केले. 

अनेक प्रसंगी जया झाल्या व्यक्त जया यांनी पती, मुले, सून यांच्याविषयी परखड मत मांडले. अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिषेक यांचा साखरपुडा होणार होता आणि अचानक ब्रेकअपची बातमी आली तर करिश्माचे म्हणणे होते की अभिषेकची आई जया बच्चन या खूप लुडबुड करतात. रणबीर कपूर सोबतच्या ऐश्वर्याच्या दवरदेखील त्यांनी आक्षेप घेतला होता. 

  • 1966 मध्ये प्रजासत्ताकदिनी बेस्ट ऑल इंडिया एनसीसी कॅडेटचा पुरस्कार दिला होता.
  • 1972 मध्ये पहिल्यांदा ‘उपहार’साठी फिल्मफेअर मिळाले होते. एकूण ९ फिल्मफेअर मिळाले.
  • 1988 मध्ये प्रदर्शित झालेला शहंशाहचे चित्रपट कथानक जया बच्चन यांनी लिहिले होते.
  • 1992 मध्ये जया यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
  • 1995 मध्ये लग्नाच्या २२ वर्षांनंतर जया यांनी अमिताभसोबत मराठी "अक्का'या चित्रपटात काम केले
बातम्या आणखी आहेत...