आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांना 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कोरोनाची लागण झाली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग तातडीने थांबवण्यात आले आहे. अलीकडेच या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणा-या अभिनेत्री शबाना आझमी यांनाही कोरोना झाला आहे.
जया बच्चन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी शबाना आझमी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता जया बच्चन यांचादेखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे करण जोहरने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, "चित्रपटाचे शूटिंग 2 फेब्रुवारीला सुरू झाले होते आणि शेड्यूल 14 फेब्रुवारीला संपणार होते. आधी शबाना आझमी पॉझिटिव्ह आल्या आणि नंतर जया बच्चन. करणने नुकतेच शूटिंग थांबवले आहे. बाकीकोणत्याही कलाकार किंवा क्रूसोबत करणला कोणताही धोका पत्करायचा नाही."
करण जोहरने थांबवले चित्रपटाचे शूटिंग
2020 मध्ये जया बच्चन यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी जया बच्चन सुरक्षित होत्या, मात्र यावेळी त्या देखील कोविडपासून वाचू शकल्या नाहीत. दुसरीकडे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाबद्दल बोलायचे तर गेल्यावर्षीच करण जोहरने या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्याशिवाय शबाना आझमी, धर्मेंद्र यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. कोरोनामुळे करण जोहरने त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.